विदर्भात भाजपची ‘दादा’गिरी, 62 पैकी शिवसेनेला आठच जागा सोडण्याची तयारी

विदर्भातील 62 जागांपैकी अवघ्या आठ ते दहा जागा शिवसेनेला देण्याची भाजपची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विदर्भात भाजपची 'दादा'गिरी, 62 पैकी शिवसेनेला आठच जागा सोडण्याची तयारी
Follow us
| Updated on: Sep 18, 2019 | 9:01 AM

नागपूर : शिवसेना-भाजप युती होणार का? झाल्यास शिवसेना मोठा भाऊ असणार की लहान भाऊ? जागावाटपाचा नेमका फॉर्म्युला काय असणार? असे अनेक प्रश्न अनुत्तरित असतानाच आता विदर्भात भाजपची धाकट्या भावावर ‘दादा’गिरी करताना दिसत आहे. कारण विदर्भातील 62 जागांपैकी अवघ्या आठ ते दहा जागा (Shivsena BJP Vidarbha Formula) शिवसेनेला देण्याची भाजपची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं बिगुल या आठवड्यात कधीही वाजू शकतं. एकीकडे ‘आमचं ठरलंय’ असं शिवसेना-भाजपचे नेते फक्त सांगत असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी मात्र ठरवून मोकळी झाली आहे. आघाडीवर शिक्कामोर्तब झालं आहे, मात्र सेना-भाजप युतीचा अद्याप पत्ता नाही. जागावाटपाचं घोंगडं भिजत असतानाच विदर्भात भाजप शिवसेनेला दहापेक्षा जास्त जागा सोडण्यास तयार नसल्याचं समोर आलं आहे.

विदर्भातील 62 जागांवर भाजपचे 44 आमदार आहेत. तर 2014 मधील विधानसभा निवडणुकीत 11 जागांवर भाजपचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. दुसरीकडे, शिवसेनेला मात्र विदर्भातील अवघ्या चार जागांवर विजय मिळवता आला होता.

युती झाल्यास कोणतीही रिस्क न घेता, शिवसेनेला दहा जागांवर लढू देण्याचा भाजपचा विचार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. म्हणजेच भाजपला विदर्भात 54 ते 55 जागा (Shivsena BJP Vidarbha Formula) लढवायच्या आहेत. 2014 मध्ये विधानसभेला दोन्ही पक्ष स्वबळावर लढले होते, मात्र 2009 च्या निवडणुकीत युतीत लढताना शिवसेनेने 23 जागा लढवल्या होत्या, तर भाजपने 39 जागांवर आपले उमेदवार दिले होते.

यावेळी मात्र 39-23 वरुन हे सूत्र थेट 54-8 वर येण्याचे संकेत आहेत. असंतुलित तिकीटवाटप झाल्यास विदर्भात शिवसेना-भाजप वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे शिवसेनेतील इच्छुक बंडाचं निशाण फडकवण्याची शक्यताही वर्तवली जाते.

युतीत शिवसेनेच्या वाट्याच्या जागेवर भाजपचा दावा

युतीच्या फॉर्म्युलामध्ये जवळपास 22 ते 25 जागांची अदलाबदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी  आणि काँग्रेसचे जे विद्यमान आमदार भाजप-शिवसेनेमध्ये आले आहेत, त्यांच्या जागांबाबत ही अदलाबदल होईल.

भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार काही ठिकाणी शिवसेनेची ताकद कमी (Shivsena BJP) झाली आहे. या जागा घेण्यासाठी भाजप उत्सुक असल्याचंही सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे भाजप-शिवसेनेत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवताना काही पारंपरिक जागांचीही अदलाबदल होणार आहे.

विद्यमान आमदार भाजपचा असल्यामुळे रामटेक आणि काटोलची जागा भाजप लढवणार, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

भाजपने शिवसेनेला 110 जागांचा प्रस्ताव दिल्याची सुरुवातीला माहिती होती. मात्र शिवसेना 135-135 आणि मित्रपक्षांना 18 जागा या फॉर्म्युल्यावर ठाम होती.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.