ओवेसींविरोधात उभा राहिलेल्या शिवसेना उमेदवाराचं डिपॉझिट जप्त
Telangana assebmly election result : वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी यांनी तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे ते भाऊ आहेत. सभेतील वादग्रस्त भाषणं आणि वक्तव्यांमुळे अकबरुद्दीन ओवेसी चर्चेत असतात. अकबरुद्दीन ओवेसींनी चंद्रयान गुट्टा या मतदारसंघातून सलग पाचव्यांदा विजय मिळवला. त्यांच्याविरोधातील काही उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. डिपॉझिट […]
Telangana assebmly election result : वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी यांनी तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे ते भाऊ आहेत. सभेतील वादग्रस्त भाषणं आणि वक्तव्यांमुळे अकबरुद्दीन ओवेसी चर्चेत असतात. अकबरुद्दीन ओवेसींनी चंद्रयान गुट्टा या मतदारसंघातून सलग पाचव्यांदा विजय मिळवला. त्यांच्याविरोधातील काही उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.
डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये शिवसेना उमेदवाराचाही समावेश आहे. शिवसेनेचे उमेदवार सुदर्शन मलकान यांना केवळ 197 मतं मिळाली. यासोबतच एकूण 14 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. या मतदारसंघात भाजपचा उमेदवार दुसऱ्या, तर टीआरएसचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, अकबरुद्दीन यांना 95 हजार 311 मतं मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजप उमेदवाराला 15 हजार 48 मतं आणि टीआरएसच्या उमेदवाराला येथे 14 हजार 223 मतं मिळाली आहेत. तर चौथ्या क्रमांकावर काँग्रेसच्या उमेदवार उमेदवाराला 11 हजार 304 मतं मिळाली आहेत.
या मतदारसंघामध्ये 1999 पासून एमआयएमने कायमच आपलं वर्चस्व राखलं आहे. अकबरुद्दीन हे पाचव्यांदा या मतदारसंघातून निवडून आले. शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा नोटा म्हणजेच यापैकी एकही नाही या पर्यायाला 1009 मतं मिळाली आहेत.
तेलंगणा विधानसभेची सदस्यसंख्या 119 आहे. बहुमतासाठी 60 जागांची गरज आहे. सुरुवातीच्या कलांनुसार टीआरएसने हा आकडा कधीच गाठलाय. टीडीपी आणि काँग्रेसने तेलंगणात एकत्र निवडणूक लढवली आहे. तरीही दोन्ही पक्षांना खास कामगिरी करता आली नाही. भाजपलाही नेहमीप्रमाणे दक्षिणेतील आणखी एका राज्याने नाकारलं आहे.
तेलंगणासोबतच राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम या राज्यांचीही मतमोजणी होत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ही तीन राज्य भाजपच्या हातून गेल्यात जमा आहेत. काँग्रेसने राजस्थानमध्ये दमदार पुनरागमन केलं आहे.