Image Credit source: social media
नवी दिल्लीः आमच्याकडे अजूनही बहुमताचा आकडा आहे, असा मोठा दावा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सुप्रीम कोर्टात (Supreme court) केला आहे. भाजपकडे तेवढं संख्याबळ नाही. त्यांना केवळ अपक्षांची साथ आहे, असं कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टासमोर म्हटलंय. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सध्या अंतिम टप्प्यात आहे. सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सलग दोन दिवस युक्तीवाद केल्यानंतर आज कोर्टाने दोन्ही पक्षाच्या वकिलांना लेखी स्वरुपात म्हणणं मांडण्याचे आदेश दिले होते. आज सकाळपासून पुन्हा कोर्टासमोरील या खटल्याची सुनावणी सुरु झाली आहे. सुरुवातीलाच घटनापीठातील सदस्यांमध्ये राज्यपालांच्या अधिकारांवरून चर्चा झाली. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी सत्ता स्थापन करण्यासाठीच्या आकड्यांवरून मोठं भाष्य केलंय.
कपिल सिब्बल काय म्हणाले?
- कपिल सिब्बल म्हणाले सरकार पाडण्यासाठी राज्यपाल मदत करू शकत नाहीत. यानंतर तुमच्याकडे बहुमत होतं, हे कसं म्हणू शकता, असा सवाल सिब्बल यांना केला. अपात्र आमदारांचा आकडा यातून वगळला तरी ते कसं होऊ शकतं, हे सांगा, असं कोर्ट म्हणालं. यानंतर कपिल सिब्बल यांनी
- शिंदे-फडणवीस यांच्याकडे 127 जणांचं संख्याबळ नाही, असा दावा कपिल सिब्बल यांनी केला. भाजपकडे 106 संख्याबळ आहे. शिंदे गटाकडील आमदार आणि अपात्रतेची
- तर सरन्यायाधीशांनी कपिल सिब्बल यांनी दिलेल्या आकडेवारीवरून भाष्य केलं. शिवसेनेचे 55, काँग्रेसचे 44 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 यांची बेरीज करून 106 आकडा होतो. जो 127 पेक्षा कमी आहे, असं वक्तव्य केलं. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी आमच्याकडे 14 अपक्षांची साथ होती, असा मोठा दावा केला.
- कपिल सिब्बल यांनी कोर्टात प्रश्न उपस्थित केला की, 39 किंवा 34 आमदार राज्यपालांकडे जातात आणि ते शिवसेनेत आहे म्हणतात आणि शपथविधीचा दावा करतात ,हे कसं होऊ शकतं..
भाजपला वाटलं असतं आम्ही बहुमत गमावलं आहे, तर त्यांनी राज्यपालांकडे जायला हवं होतं. पण इथे राज्यपालांनी हस्तक्षेप करणं चुकीचं आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टात केला.
- राज्यपालांनी त्या 39 आमदारांनी बंडखोरी केल्याचं गृहित धरलं आणि तिथेच खरी समस्या आहे. आम्ही अल्पमतात आहोत की बहुमतात, हे राज्यपाल सांगू शकत नाहीत. सरकार अस्थिर आहे, हे राज्यपाल सांगू शकत नाहीत, असं वक्तव्य कपिल सिब्बल यांनी कोर्टात केलं.