Uddhav Thackeray : “एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत”, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

Eknath Shinde : एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 2:38 PM

मुंबई :एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मागच्या 11 दिवसांपासून एकनाथ शिंदे “आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आमचा गट हीच शिवसेना आहे. बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही झगडतोय”, असं त्यांनी वारंवार सांगितलं. पण आज उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, असं स्पष्टपणे सांगितलं आहे. शिवसेनेला वगळून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. शिवसेनेला वगळून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. याशिवाय माझ्याशी असलेलं वैर मुंबईवर थोपवू नका, असं म्हणत मेट्रो कारशेड हलवू नका, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलंय.

“ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं, आणि ज्याने हे सरकार स्थापन केलं, कथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. हेच मी अमित शाहांना सांगत होतो, अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री व्हावा, आताची जोडगोळी अशीच अडची वर्ष झाला असतो.. पहिल्या अडीच वर्षात याचा नाहीतर त्यांचा मुख्यमंत्री जाला. मग आता असं का केलं.. लोकसभा विधानसभेत एकत्र होतो. मग मला कशाला मध्ये मुख्यमंत्री बनायला लावलं… आता जे केलात ते तेव्हाच केलं असतं तर मविआ जन्मालाच आला नसता.. पाठीत वार करुन शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही… हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही.. पहिल्या प्रथम तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसत असेल.. पण मुंबईच्या पाठीत वार खुपसू नका”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

“माझा राग मुंबईवर काढू नका”

कांजूरचा प्रस्ताव आहे, त्यात अहंकार नाही. माझा राग मुंबईवर काढू नका. आरेचा आग्रह उगाच रेटू नका. पर्यावरणाची हानी करणारा निर्णय घेऊ नका, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

जनतेचे आभार!

“महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा ऋणी आहे. अनपेक्षित आल्यानंतर तो पद सोडताना क्वचितच लोक रडतात, तुमच्या डोळ्यात जे अश्रू आहेत, तीच माझी ताकद, त्याच्याशी प्रतारणा करणार नाही, गद्दारी करणार नाही.विचित्र पद्धतीने शिवसेना प्रमुखांचा पुत्र उतरवून स्वतः मुख्यमंत्री बनण्याचा हा अट्टाहास त्यांनी केला.. हा डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही… हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे”, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.