Monsoon Session: “गद्दारांना भाजपची ताट वाटी, चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी!”, शिंदे सरकार विरोधात विरोधकांचा हल्लाबोल

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अश्यात विधानसभेचं कामकाज सुरु होण्याआधी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं. यावेळी त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली

Monsoon Session: गद्दारांना भाजपची ताट वाटी, चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी!, शिंदे सरकार विरोधात विरोधकांचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 12:37 PM

मुंबई : सध्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरु आहे. अश्यात विधानसभेचं कामकाज सुरु होण्याआधी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं. यावेळी त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. शिंदेगटाच्या बंडाचं केंद्र असलेल्या गुवाहाटीचा संदर्भ देत महाविकास आघाडीच्या (MahaVikas Aghadi) नेत्यांनी घोषणा दिल्या. “गद्दारांना भाजपची ताट वाटी, चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी!”, या घोषणेने सर्वाचंच लक्ष वेधलं.एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं. आधी सूरत मग गुवाहाटी त्यानंतर गोवा अन् मग ते महाराष्ट्रात आले. त्यांच्या बंडाचं केंद्र गुवाहाटी होतं. गुवाहाटीतील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये महाराष्ट्राच्या सत्तेची गणितं आखली गेली. त्याचाच धागा धरत विरोधकांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केलाय.

सध्या राज्यात ईडी सक्रीय आहे. काही दिवसांआधी शिवसेना खासदार संजय राऊतांना अटक करण्यात आली आहे. अश्यातच भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी दोन दिवसात 5 ट्विट केले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवून दिली. “माझं हे ट्विट सेव्ह करुन ठेवा! अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा!”, असं सूचक इशारा देणारं ट्विट मोहित कंबोज यांनी केलंय. त्या पार्श्वभूमीवर ईडीईडीच्या घोषणा विधिमंडळ परिसरात ऐकायला मिळाल्या.

हे सुद्धा वाचा

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी विधानसभेच्या कामकाजावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचं पाहायला मिळालं. आता आज दुसरा दिवस आहे. विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला प्रश्न विचारत आहेत. अधिवेशन सुरु होण्याआधी महाविकास आघाडीचे आमदार विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाला.

मोजके शब्दात कठोर हल्लाबोल

अदिवेशनाच्या पहिल्या दिवशीदेखील अश्या घोषणांनी विधिमंडळ परिसर दुमदुमुन निघाला. “50 खोके एकदम ओके!”,”रोक घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो!”,”सुधीरभाऊंना चांगलं खातं न सरकारचा धिक्कार असो!”, अश्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी यावेळी सरकारचा निषेध केला. “आले रे आले गद्दार आले”, असं म्हणत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.