Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“माझी बायको माझं ऐकत नाही, वाऱ्यावर सोडलीय, म्हणून तुम्ही खपवून घेता”, दिपाली सय्यदचा फडणवीसांना पुन्हा सवाल

"माझी बायको माझं ऐकत नाही, वाऱ्यावर सोडलीय, म्हणून तुम्ही खपवून घेता. अमृता फडणवीस मुख्यमंत्र्यांवर टीका करतात त्यांना कुणी बोलत नाही, मग मला रोखण्याचा अधिकार नाही", असं दिपाली सय्यद यांनी म्हटलंय.

माझी बायको माझं ऐकत नाही, वाऱ्यावर सोडलीय, म्हणून तुम्ही खपवून घेता, दिपाली सय्यदचा फडणवीसांना पुन्हा सवाल
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 8:02 PM

मुंबई : “माझी बायको माझं ऐकत नाही, वाऱ्यावर सोडलीय, म्हणून तुम्ही खपवून घेता. अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात त्यांना कुणी बोलत नाही, मग मला रोखण्याचा अधिकार नाही”, असं अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Devendra Fadanvis) यांनी म्हटलंय. त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारलाय.

दिपाली सय्यद काय म्हणाल्या?

“माझी बायको माझं ऐकत नाही, वाऱ्यावर सोडलीय, म्हणून तुम्ही खपवून घेता. अमृता फडणवीस मुख्यमंत्र्यांवर टीका करतात त्यांना कुणी बोलत नाही, मग मला रोखण्याचा अधिकार नाही”, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

आपल्या मुख्यमंत्र्याबद्दल हे सर्व बोललं जातंय. हे आम्ही खपवून घेणार नाही. त्यांना जश्यास तसं मी दिलंय. पंतप्रधानांवर बोललं तर यांना झोमतं मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल हे कुठल्या अधिकारवाणीने बोलतात? त्यांचं बोलणं चालतं का?, त्यांना कुणी विचारत नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत.

“भाजपच्या कार्यकर्ते आणि नेते मुखमंत्र्यांना काहीही बोलतात हे पद नाही आहे का त्यांची भाषा कशी याला आपण प्रतिउत्तर करतोय तर तूम्ही मला मारणार का? भाजप क्राईमचा डोंगर आहे. या माझ्या घरात बघुयात मग…”, असं म्हणत दिपाली सय्यद यांनी भाजपला आव्हान दिलंय.

दिपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल

दिपाली सय्यद यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवरआक्षेपार्ह भाषेत टीका करणं चांगलंच महागात पडलं आहे. दिपाली सय्यद यांच्याविरोधात मुंबईतील  ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपाली यांनी ट्विट करत पंतप्रधानांवर जोरदार टीका केली होती. त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं. भाजपमध्ये घोटाळेबाज मंत्र्यांना पाठिंबा दिला जातो असं म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली होती. “किरीट सोमय्याने आरोप केल्यानंतर मंत्री बीजेपीमध्ये जाऊन पवित्र होतात. मग पंतप्रधान त्यांना पाठिंबा देतात. त्यांच्या घोटाळ्याबाबत नंतर त्यांना कुणीच काही बोलत नाही. असा —- (आक्षेपार्ह शब्द) पंतप्रधान अख्ख्या भारताने पाहिला नसेल”, असं त्यांनी म्हटलं होतं.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.