शिवसेनेला सत्ता देऊ नका, त्यांना काही कळत नाही : शरद पवार
मुंबईकर शिवसेनेच्या (Sharad Pawar on Shivsena) नेत्यांना शेतातलं काही माहित नाही. त्यांच्याकडून शेती प्रश्न आणि उपाययोजना कशा होतील? असा सवाल शरद पवार यांनी केला.
उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Shivsena) यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. शिवसेनेच्या हातात राज्य देऊ नका. त्यांना काहीही कळत नाही. मुंबईकर शिवसेनेच्या (Sharad Pawar on Shivsena) नेत्यांना शेतातलं काही माहित नाही. त्यांच्याकडून शेती प्रश्न आणि उपाययोजना कशा होतील? असा सवाल शरद पवार यांनी केला. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूममध्ये शरद पवार बोलत होते.
“एकदा मी मुंबई येथून शिवसेनेच्या नेत्यांसोबत येत असताना शेतात सोयाबीन दिसलं. त्यावेळी मी म्हणालो, सोयाबीन छान आहे. ते म्हणाले छान, कुठे आहे? शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांना सोयाबीन कुठे येते, शेंगा कुठे असतात ते माहित नाही, रताळे जमिनीत येतात की जमिनीच्या वर हेही माहीत नाही. त्यामुळे त्यांना शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही, त्यांच्या हातात सत्ता देऊ नका,” असं आवाहन शरद पवार यांनी केलं.
अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यावरुनही शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. पवारांची बदनामी केल्याशिवाय राज्य टिकेल असं वाटत नाही. त्यामुळे 70 जणांची नावे राज्य बँकेच्या प्रकरणात असताना फक्त पवारांची चर्चा होते. खुशाल गुन्हा दाखल करा, मी चिंता करत नाही, असंही पवार म्हणाले.
मोठ्या बँकातून व्यापाऱ्यांनी काढलेल्या कर्जाचे 90 हजार कोटी उद्योजकांनी बुडविले, केंद्र सरकारने ही रक्कम भरली. व्यापाऱ्यांचे पैसे सरकार भरते, सवलत देते, मात्र शेतकऱ्यांना मदत करत नाही, असा आरोप पवारांनी केला.
आशिष शेलारांचा पवारांवर हल्लाबोल
शालेय शिक्षण मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी पवार कुटुंबीयांवर तुफान हल्ला चढवला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेलार यांनी राज्य सहकारी बँक घोटाळ्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांना लक्ष्य केलं.
शेलार म्हणाले, “गेल्या काही दिवसात एका कुटुंबाचं नाट्य समोर आलं. 11 हजार कोटींच्या राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटींचा घोटाळा कसा असं अजितदादा म्हणाले. या आकड्यांची स्पष्टता देण्यासाठी म्हणून मी आकडेवारी देतो. हे म्हणाले अजितदादा यांचं नाव होतं म्हणून गुन्हा दाखल झाला. पण खरं तर कर्ज समितीचे सदस्य म्हणून 8 वेळा कोर्टाने त्यांचं नाव घेतलं आहे”.