दसरा मेळावासाठी ठाकरे गटाकडून तीन महिन्यांपूर्वीच अर्ज, मात्र अद्याप परवानगी नाही

शिवसेनेसाठी दसरा मेळावा हा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. येत्या 12 ऑक्टोबर रोजी दसरा असून आता फक्त 20 च दिवस शिल्लक आहेत.

दसरा मेळावासाठी ठाकरे गटाकडून तीन महिन्यांपूर्वीच अर्ज, मात्र अद्याप परवानगी नाही
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 9:00 AM

Shivsena Thackeray Group Dussehra melava : गणेशोत्सवानंतर आता सर्वांना नवरात्रोत्सव आणि दसरा सणाचे वेध लागले आहेत. दसरा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी दसरा मेळावा रंगताना दिसणार आहे. आता दसरा मेळाव्यासाठी फक्त ठाकरे गटाकडूनच अर्ज करण्यात आला आहे. मात्र अद्याप या मेळाव्याला मुंबई महापालिकेकडून परवानगी देण्यात आलेली नाही.

शिवसेनेसाठी दसरा मेळावा हा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. येत्या 12 ऑक्टोबर रोजी दसरा असून आता फक्त 20 च दिवस शिल्लक आहेत. दसऱ्याला अवघे काही दिवस शिल्लक असून यंदा दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर शिवसेनेच्या दोन गटांपैकी कोणाला सभा घेण्यास परवानगी मिळणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र यावेळी फक्त शिवसेनेच्या ठाकरे गटानेच छत्रपती शिवाजी महाराज पार्कसाठी पालिका प्रशासनाकडे अर्ज सादर केला आहे. ठाकरे गटाकडून तीन महिन्यांपूर्वीच याबद्दलचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.

महेश सावंत यांनी तीन महिन्यांपूर्वीच केला अर्ज

मुंबईतील दादर परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणजेच शिवाजी पार्क या ठिकाणी दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा रंगतो. राज्यातील राजकीय संघर्षामुळे शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्यावरुन शिवसेनेच्या दोन्ही गटात प्रतिष्ठेची लढाई सुरु आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांनी दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवाजी पार्क मिळावा, यासाठी परवानगी अर्ज दिला आहे. महेश सावंत यांनी तीन महिन्यांपूर्वीच हा अर्ज केला आहे. मात्र अद्याप यावर पालिका प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे महेश सावंत यांनी सांगितले.

विशेष म्हणजे महेश सावंत यांनी या प्रकरणी पालिकेला तीन वेळा स्मरणपत्रही पाठवले आहे. मात्र यावर कोणतेही उत्तर प्राप्त झालेले नाही. तर दुसरीकडे दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाचाच अर्ज आला असला तरीही कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही, अशी माहिती समोर येत आहे.

राज्यातील शिवसैनिक शिवाजी पार्कवर

दरम्यान शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा हा १९६६ साली झाला होता. त्यानंतर पाऊस आणि करोना काळ अशा मोजक्या घटनांचा अपवाद वगळता सातत्याने शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर २०२२ ला झालेल्या दसरा मेळाव्यात मैदानाच्या परवानगीवरून दोन गटात जोरदार तू तू मै मै पाहायला मिळाले होते. या दोन गटांतील वाद न्यायालयात पोहोचला होता. यानंतर ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन लढाईनंतर ठाकरे गटाला परवानगी देण्यात आली होती. त्या मेळाव्याला राज्यातील शिवसैनिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.

यानंतर गेल्यावर्षी २०२३ च्या दसरा मेळाव्यालाही शिवसेनेच्या दोन्ही गटांनी अर्ज दिले होते. तेव्हाही ठाकरे गटाने पालिका प्रशासनाला स्मरणपत्र दिले होते. तसेच विभाग कार्यालयावर मोर्चाही काढला होता. हा वाद टोकाला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवाजी पार्क मैदानासाठी केलेला अर्ज मागे घेतला होता. गेल्यावर्षी शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानावर झाला होता. यंदा मात्र अद्याप शिंदे यांच्या शिवसेनेने अर्ज दाखल केल्याची माहिती मिळत आहे.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.