जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात शिवसेनेकडून मराठी अभिनेत्रीला उमेदवारी
4 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख असल्यामुळे शिवसेनेने नाव जाहीर (deepali sayyad mumbra kalwa) केलं आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड उमेदवार आहेत.
ठाणे : शिवसेनेने मुंब्रा-कळवा मतदारसंघातून मुस्लीम आणि सेलिब्रिटी कार्ड खेळलं आहे. कारण, मराठी अभिनेत्री दीपाली सय्यदला (deepali sayyad mumbra kalwa) शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 4 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख असल्यामुळे शिवसेनेने नाव जाहीर (deepali sayyad mumbra kalwa) केलं आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड उमेदवार आहेत.
जितेंद्र आव्हाड यांचं कळवा-मुंब्रा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व आहे. 2014 च्या निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांनी तब्बल 1 लाख 18 हजारांपेक्षा जास्त, तर शिवसेना उमेदवार दशरथ पाटील यांना 38 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली होती. 2014 ला या मतदारसंघात एमआयएमचा उमेदवार तिसऱ्या आणि भाजपचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर होता.
मुंब्रा-कळव्यातून जितेंद्र आव्हाड यांनी 2009 च्या निवडणुकीतही मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीकडूनही उमेदवार देण्यात येणार आहे, शिवाय एमआयएमच्या उमेदवारामुळेही मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन होणार आहे.
कोण आहे दीपाली सय्यद?
दीपाली सय्यद नुकतंच साकळाई उपसा सिंचन योजना पूर्ण होण्यासाठी उपोषण केल्यामुळे चर्चेत आल्या होत्या.
दीपाली सय्यद मागील 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून नगर दक्षिणच्या उमेदवार होत्या. मात्र आम आदमी पार्टी ही दिल्ली पुरती मर्यादित आहे. त्यामुळे मी आपचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसंग्राममध्ये प्रवेश केला, असं दीपाली सय्यदने सांगितलं होतं.
कोण आहे दीपाली सय्यद?
- दीपाली सय्यद ही अभिनेत्री म्हणून परिचीत आहे
- अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि रिअलिटी शोमध्ये दीपाली सय्यद दिसली आहे.
- दीपाली सय्यदने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवालांच्या आपकडून निवडणूक लढवली होती.
- त्या निवडणुकीत दीपाली सय्यदचा पराभव झाला होता.
- दीपाली सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी आप सोडून विनायक मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेते प्रवेश केला
- गेल्या काही दिवसांपासून दीपाली सय्यद सामाजिक कार्यांमध्ये पाहायला मिळत आहेत.
- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांना पाठिंबा दिला होता.