Balasaheb Thackeray death anniversary | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांना अभिवादन

| Updated on: Nov 17, 2020 | 4:48 PM

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी अनेक शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होत आहे. (ShivSena founder Balasaheb Thackeray death anniversary Live Update)

Balasaheb Thackeray death anniversary | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांना अभिवादन
Follow us on

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 8 वा (17 नोव्हेंबर 2020) स्मृतीदिन. दरवर्षी या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन त्यांना अभिवादन करत असतात. यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने गर्दी करू नका, संयम पाळा, जेथे आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. (ShivSena founder Balasaheb Thackeray death anniversary Live Update)

या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर अभिवादन केले. यावेळी उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, सुपुत्र आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला अभिवादन केले.

उद्धव ठाकरे यांचे कुटुंब केवळ पाच ते दहा मिनिटं या ठिकाणी उपस्थित होते. या आधी शिवसेना खासदार संजय राऊत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवतीर्थावर बाळासाहेबांना अभिवादन केले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर  गर्दी करु नका असे आवाहन केल्याने सध्या या ठिकाणी गर्दी कमी दिसत आहे.

कोविड 19 चा संसर्ग सुरू असल्यामुळे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सर्व शिवसैनिकांना मास्क आणि शारिरीक अंतर ठेवणं बंधनकारक करण्यात आले आहे.

?LIVE UPDATE?

[svt-event title=”आदित्य ठाकरे यांचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन” date=”17/11/2020,11:15AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन” date=”17/11/2020,11:12AM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर, उद्धव ठाकरेंसह, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरेंकडून बाळासाहेबांना अभिवादन [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल” date=”17/11/2020,11:14AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”शिवसेना खासदार संजय राऊत शिवतीर्थावर दाखल” date=”17/11/2020,11:10AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी राऊतांकडून दंडवत” date=”17/11/2020,11:16AM” class=”svt-cd-green” ]

कोरोनाचे संकट अद्यापही कायम असल्याने गर्दी करू नका, संयम पाळा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ‘शिवसेनाप्रमुखांचा स्मृतिदिन आहे. शिवसेनाप्रमुखांचे सर्वांच्या हृदयातील स्थान मला ठाऊक आहे. तुमच्या भावना आणि श्रद्धा मी समजू शकतो, पण यावेळी संयम पाळा. शिवतीर्थावरील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावर येऊन त्यांना मानवंदना द्यावी ही प्रत्येकाचीच भावना आहे. पण तुम्ही जिथे आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या. शिस्त आणि नियमांचे पालन करा, हीच शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली ठरेल,’ अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या या विनंतीनंतर अनेक नेते आणि मंत्र्यांसह, लाखो शिवसैनिकांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना अभिवादन केलं आहे.

(ShivSena founder Balasaheb Thackeray death anniversary Live Update)

संबंधित बातम्या : 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन साधेपणाने होणार साजरा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

मंत्रालयावर भगवा फडकणे हे बाळासाहेबांचे यश : शिवसेना