भाजपमुक्त कोल्हापूरला शिवसेना जबाबदार : चंद्रकांत पाटील

एकट्या कोल्हापुरात तब्बल 7 जागांवर युतीला फटका बसला. मात्र, याला शिवसेना जबाबदार असल्याचं सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्यावर निशाणा साधला आहे

भाजपमुक्त कोल्हापूरला शिवसेना जबाबदार : चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Oct 28, 2019 | 11:07 PM

कोल्हापूर : कोल्हापूरमुळे सध्या शिवसेना-भाजपमध्ये खटके उडू लागले आहेत (BJP-Shivsena). त्याचं कारण म्हणजे भाजपमुक्त झालेला कोल्हापूर जिल्हा. 2014 मध्ये ज्या शिवसेना-भाजपने कोल्हापुरातल्या 10 जागांपैकी 8 जागा जिंकल्या होत्या (Kolhapur Vidhansabha Results). त्या युतीला यंदाच्या निवडणुकीत कोल्हापूरमध्ये फक्त 1 जागा मिळवता आली. म्हणजे एकट्या कोल्हापुरात तब्बल 7 जागांवर युतीला फटका बसला. मात्र, याला शिवसेना जबाबदार असल्याचं सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्यावर निशाणा साधला आहे (Chnadrakant Patil on Sanjay Mandlik).

लोकसभेला काँग्रेसच्या सतेज पाटलांनी खुलेआम शिवसेनेच्या संजय मंडलिकांचा प्रचार केला (Chnadrakant Patil on Sanjay Mandlik). त्याचीच परतफेड संजय मंडलिकांनी विधानसभेला केली. पण, मंडलिकांनी फक्त कोल्हापूर दक्षिणमध्येच नव्हे तर चंदगड, कागल अशा अनेक ठिकाणी आघाडीला मदत केल्याचा आरोप आहे. मात्र मंडलिकांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

2014 मध्ये इचलकरंजी आणि कोल्हापूर दक्षिणची जागा भाजपकडे होती. मात्र, यंदा दोन्ही ठिकाणी भाजपला पराभव स्वीकारावा लागला. गटबाजी आणि पुराचा फटका या दोन्ही कारणांमुळे भाजपचा विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्याची चर्चा आहे. मात्र, चंद्रकांत पाटील युतीधर्मावरुन शिवसेनेला इशारा देत आहेत.

शिवसेनेलाही यंदा फक्त राधानगरीची जागा राखता आली. ज्या कोल्हापूरने गेल्या निवडणुकीत 10 पैकी 8 जागा, कोल्हापुरातले दोन्ही खासदार शिवसेनेच्या पारड्यात टाकले. त्या शिवसेनेने कोल्हापूरला एकही आमदार दिला नाही. त्यात स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभावही शिवसेनेच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे.

ज्या चंद्रकांत पाटलांनी आघाडीचे डझनभर नेते भाजपात आणले, त्यांना स्वतःचाच जिल्हा राखता आला नाही. इतकंच काय, तर खुद्द त्यांनाच कोथरुडमधू निवडणूक लढवावी लागली. 2014 मध्ये स्वतंत्र लढून जिंकलेल्या जागा यंदा भाजप का जिंकू शकली नाही, यावर आता चंद्रकांत पाटील आणि भाजपने विचार करायची गरज आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....