Bharat Bandh | केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवेदनशील, त्यांना चुकीची वागणूक : उर्मिला मातोंडकर
बॉलिवूड आणि मुंबईचे एक अतूट नातं आहे. ते कोणीही तोडू शकत नाही," असेही उर्मिला मातोंडकरांनी सांगितले.(Urmila Matondkar On Bharat bandh across India)
मुंबई : “भारत हा कृषिप्रधान देश आहे. लालबहादूर शास्त्री यांनी जय जवानचा नारा दिला. ज्या देशातील शेतकरी दु:खी आहे. तो देश कधीच प्रगती करु शकत नाही. त्या देशात नेहमीच अडचण होत राहणार,” असं परखड मत शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केलं आहे. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या भारत बंदला महाराष्ट्रातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावर प्रतिक्रिया देताना उर्मिला मातोंडकरांनी ही प्रतिक्रिया दिली. (Urmila Matondkar On Bharat bandh across India)
“केंद्र सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाहीत. शेतकऱ्यांना चुकीची वागणूक दिली आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवेदनशील आहे. केंद्राने शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकणं गरजेचे आहे,” असेही उर्मिला मातोंडकरांनी सांगितले.
जिस देश का #किसान दुखी वह देश कभी “विकास” नहीं कर सकता#FarmersAreLifeLine #8_दिसम्बर_भारत_बन्द #BharatBandhOn8December2020 #किसान_एकता_जिंदाबाद #ISTANDWITHFARMER pic.twitter.com/LHdYKP3ytq
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) December 8, 2020
देशभरातील महिलांच्या प्रश्नांकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जात आहे. महिलांच्या गरजांकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यांच्या आर्थिक गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत, असेही उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.
“बॉलिवूड कोणी कुठेही घेऊन जाऊ शकत नाही”
“बॉलिवूड ही लोकशाही आहे. आपल्या देशात कोणीही कुठेही चित्रपट करावं. पण हिंदी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड आणि मुंबईचे एक अतूट नातं आहे. ते कोणीही तोडू शकत नाही,” असेही उर्मिला मातोंडकरांनी सांगितले.
“चित्रपटसृष्टीचा जन्मच मुंबईत झाला आहे. देशभरातून अनेक लोक मुंबईत त्यांची स्वप्न घेऊन आले. त्यांना मुंबईने प्रसिद्धीपासून सर्व दिले. त्यामुळे बॉलिवुड कोणी कुठेही घेऊन जाऊ शकत नाही,” असेही त्या म्हणाल्या.
“आता जबाबदारी वाढली”
“यापुढे मला आता अभिनय करणे कठीण जाणार आहे. मी करणार नाही असं नाही. पण आता जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे कामाचा ताण असणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. बळीराजाने मोटार आणि ट्रॅक्टर रॅली काढून सरकारचा निषेध नोंदवताना काही ठिकाणी केंद्र सरकारच्या पुतळ्याचे दहन केले आहे. आज राज्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट होता. काही ठिकाणी व्यापाऱ्यांनीही बंदमध्ये भाग घेतल्याने मार्केट बंद होते. राजकीय पक्षांनीही या बंदमध्ये भाग घेऊन अनेक ठिकाणी निदर्शने केली. राज्यात अपवाद वगळता सर्वच ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू होती. आजच्या बंदला राज्यात कुठेही गालबोट लागले नाही. शेतकऱ्यांनी शांततेत बंद पाळून सरकारच्या आडमुठ्या धोरणांचा निषेध नोंदवला. (Urmila Matondkar On Bharat bandh across India)
संबंधित बातम्या :
‘शिवसेना शरद पवारांच्या चरणी लीन झाली’, प्रवीण दरेकरांचा शिवसेनेला चिमटा