Arjun Khotkar | अखेर कोविडने गाठलेच, माजी मंत्री अर्जुन खोतकरांना कोरोनाची लागण
कोविडचे सर्व नियम पाळूनदेखील लोकहिताची कामे करताना अखेर कोविडने मला गाठलेच, अशी पोस्ट अर्जुन खोतकर यांनी केली आहे (Arjun Khotkar Tested Corona Positive)
जालना : शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: फेसबुकवर पोस्ट टाकत याबाबतची माहिती दिली. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. (Arjun Khotkar Tested Corona Positive)
“लोक संकटात असताना नेतृत्वाने घरात बसून चालत नाही. कोविडचे सर्व नियम पाळूनदेखील लोकहिताची कामे करताना अखेर कोविडने मला गाठलेच. मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात मी उपचार घेणार असून ईश्वरकृपेने आणि लोकाशिर्वादाने लवकरच यातून बाहेर पडेल. आपल्या सदिच्छा आणि आशिर्वाद हेच माझे बळ आहे.”
“माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपआपली टेस्ट करून घ्यावी. घरीच रहा, सुरक्षित रहा शासनाच्या निर्देशानाचे सर्वांनी पालन करावे आणि सुरक्षित रहावे,” अशी पोस्ट अर्जुन खोतकर यांनी केली आहे.
राज्यात आज दिवसभरात कोरोनाचे 22 हजार 543 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 लाख 60 हजार 308 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 416 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 29 हजार 531 जणांचा मृत्यू झाला आहे.
तर गेल्या 24 तासात 11 हजार 549 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. आतापर्यंत 7 लाख 40 हजार 061 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात सद्यस्थितीत 2 लाख 90 हजार 344 जणांवर उपचार सुरु आहेत. (Arjun Khotkar Tested Corona Positive)
संबंधित बातम्या :
कोरोनामुक्त झाल्यानंतर प्रणिती शिंदे पुन्हा सक्रीय, विविध विकास कामांचा शुभारंभ
महाराष्ट्रात शाळा दिवाळीनंतरच, शालेय शिक्षण मंत्र्यांचा विद्यार्थी-पालकांना दिलासा