Eknath Shinde | एकनाथ शिंदें जादुटोणा करतात, सगळेच तिकडे, चंद्रकांत खैरें म्हणतात शिंदेंच्या तोंडात पांढरी गोळी

Khaire on Eknath Shinde: राज्यातील सत्तांतरणाच्या नाट्यचं इतकं नाटयमय घडलं की कोणाचा विश्वास बसनं अशक्यच होतं. या बंडाळीचा अंदाज आला असला तरी त्याला इतके मोठे यश मिळेल याचा थांगपत्ता कोणालाच नव्हता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी जादुटोणा करुन आमदार पळवल्याचा अजब दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

Eknath Shinde | एकनाथ शिंदें जादुटोणा करतात, सगळेच तिकडे, चंद्रकांत खैरें म्हणतात  शिंदेंच्या तोंडात पांढरी गोळी
एकनाथ शिंदे जादुटोणा करतात!Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 6:24 PM

Latest news on Maharashtra politics: राज्यातील सत्तांतरणाच्या नाट्यचं इतकं नाटयमय घडलं की कोणाचा विश्वास बसनं अशक्यच होतं. या बंडाळीचा अंदाज आला असला तरी त्याला इतके मोठे यश मिळेल याचा थांगपत्ता कोणालाच नव्हता. या धक्क्यातून सावरायला पक्ष नेतृत्वालाच काळी काळ जावा लागला. सुरुवातीला सावध भूमिका नंतर हतबलता, पुन्हा आक्रमकता आणि आता जे होईल त्याला सामोरे जाऊ इथंपर्यंत या राजकीय नाट्यात शिवसेनेने (Shivsena) भूमिका बदलली आहे. शाब्दिक प्रहारानंतर बंडखोर नेत्यांच्या कार्यालयावर हल्ले ही झाले. पण नाराजीतून पक्षात इतकी उभी फूट पडण्याची अपेक्षा कोणालाच नव्हती. कालपर्यंत पक्षाच्या बैठकांना हजेरी लावणा-या नेत्यांनीही गुपचूप गुवाहाटी जवळ केल्याने शिवसैनिकच काय उरले सुरले नेते ही सैरभैर झाले आहे. त्यातूनच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जादुटोणा (Witchcrafts) करुन आमदार पळवल्याचा अजब दावा केला आहे.

काय आहे खैरेंचा दावा

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे एका सभेत बोलताना शिवसेना नेते खैरे यांनी अजब दावा केला आहे. त्या तिथे गुवाहाटीला काय सुरु आहे? असा प्रश्न विचारत, एकनाथ शिंदे यांनी आमदारांना वेठबिगार केल्याचा आरोप केला. एवढ्यावरच न थांबता शिंदे यांनी जादुटोणा केल्याचा दावा केला. एकनाथ शिंदे हे जादुटोणा करणारे असल्याचा गंभीर आरोप ही त्यांनी लावला. त्यांच्या तोंडात कायम पांढरी गोळी असल्याचा दावा ही त्यांनी केला. त्यांनी जादुटोणा करुनच हे सर्व आमदार आपल्या गोटात ओढल्याचा आरोप खैरे यांनी या सभेत बोलताना केला. त्यांच्या या विधानाकडे आता मनोरंजन म्हणून बघायचे, हतबलता म्हणून पहायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

हे सुद्धा वाचा

सत्ता स्थापनेसाठी ही मुहूर्त

बंडखोर शिवसेना गटासोबत भाजपचे नवे सरकार लवकरच राज्यात स्थापन्याच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) कोणत्याही क्षणी राजीनामा देण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत. यावेळी सत्तेचा फॉर्म्युला ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सुद्धा दिल्लीत जाणार असल्याचं सांगितलं जातं. शिंदे हे दिल्लीत फडणवीस आणि नड्डा यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. यावेळी आषाढ अमावस्येनंतरच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना सत्ता स्थापनेचा प्रस्ताव देण्यावर चर्चा केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.राजकारण्यांच्या मनात अमावस्येची प्रचंड भीती आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी अमावस्यानंतरचा मुहुर्त गाठणार असल्याची चर्चा आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.