जळगाव : “नारायण राणे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत” अशा शब्दात शिवसेनेचे तडाखेबाज नेते गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला आहे. माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी ‘नाणार’ प्रकल्पाबाबत शिवसेनेवर केलेल्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी जळगावातून जोरदार प्रत्युत्तर दिले. (Shivsena Leader Gulabrao Patil slams Narayan Rane in Jalgaon)
“नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. आता त्यांना काहीही कामधंदा उरलेला नाही. ते घरी काही बोलतात, बाहेर काही वेगळेच बोलतात. शेवटी त्यांना अशी विधाने करुन स्वतःचा टीआरपी म्हणजेच प्रसिद्धी मिळवायची असते.” असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी केला.
“नारायण राणे स्वतः मुख्यमंत्री असताना कोकणात कोणताही नवीन प्रकल्प आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी बाकीच्या गोष्टींविषयी तर काही बोलूच नये. ते जर असे काही बोलले नाहीत, तर त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही” असा चिमटा देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी राणेंना काढला.
नारायण राणे काय म्हणाले होते?
“नाणार प्रकल्पाला काही स्थानिकांनी दोन दिवसांपूर्वी समर्थन दिलं. त्यात 80 टक्के शिवसैनिक होते. पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे. बोलण्यात काय बदल करतील हे सांगू शकत नाही. पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करत आहेत. हे शिवसेनेचे घुमजाव आहेत. ही स्थानिक जनतेची फसवणूक आहे.” असा घणाघाती आरोप नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी करताना केला होता.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
नाणारबाबत आपली भूमिका व्यक्त करताना नारायण राणे यांनी जनता ज्या दिशेने जाईल त्या दिशेने आम्ही जाणार असल्याचं म्हटलं.
पहा व्हिडीओ :
(Shivsena Leader Gulabrao Patil slams Narayan Rane in Jalgaon)