Jalgaon : बोदवडमध्ये भाजप शिवसेनेच्या छुप्या युतीची चर्चा, आता गुलाबराव पाटील थेट गिरीश महाजन यांच्या घरी

बोदवड नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, रोहिणी खडसे, शिवसेनेला समर्थन दिलेले आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजपकडून गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जोरदार प्रचार केला होता.

Jalgaon : बोदवडमध्ये भाजप शिवसेनेच्या छुप्या युतीची चर्चा, आता गुलाबराव पाटील थेट गिरीश महाजन यांच्या घरी
गुलाबराव पाटील गिरीश महाजन
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 7:28 AM

जळगाव : राज्यात नुकतीच नगरपंचयात निवडणुकांची रणधुमाळी पार पडली. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीची राज्यात सर्वाधिक चर्चा रंगली. बोदवड नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, रोहिणी खडसे, शिवसेनेला समर्थन दिलेले आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजपकडून गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जोरदार प्रचार केला होता. मात्र, निवडणुकीच्या निकालात चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली. तर, एकनाथ खडसे यांच्या गटाची सत्ता थोडक्यात हुकली होती. नगरपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाअगोदर जळगावचे पालकमंत्री शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात भेट होऊन चर्चा झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा जळगावच्या राजकारणात गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या भेटीनं चर्चा रंगल्या आहेत. जळगाव जामनेरात शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी एकाच गाडीमध्ये बसत चर्चा केलीय.

गुलाबराव पाटील थेट गिरीश महाजन यांच्या घरी दाखल

बोदवड नगरपंचायत निकालावरून भाजप सेना छुप्या युतीची चांगलीच चर्चा रंगत असताना दोन्ही नेते एकाच गाडीमध्ये चर्चा करत असल्याचं दिसून आलं आहे. एकनाथ खडसेंना बोदवड नगरपंचायतीमध्ये होमपीचवर सेनेने धक्का दिला होता. बुधवारी विशेषत: जामनेरमध्ये एक कार्यक्रम आटपून गिरीश महाजन यांच्या घरी पालकमंत्री गुलाबराव पाटील गेले.यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला.

आंदोलनाच्या ठिकाणी गुलाबराव पाटील यांना बोलवायचं का?

गिरीश महाजन हे विविध मुद्यावर राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचं नियोजन करण्यासाठी काही कार्यकर्ते महाजन यांच्या घरी पोहोचले होते. आज होणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधातील आंदोलनात गुलाबराव पाटील यांना बोलवायचं का? असा सवाल गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना केला. गिरीश महाजन यांनी हा प्रश्न विचारताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

गिरीश महाजन यांची एकनाथ खडसेंवर टीका

बोदवड नगरपंचायतीबाबतीत एकनाथ खडसे यांना काही म्हणायचे ते म्हणू द्या. विधानसभेत एकनाथ खडसे पडले खरं तर ते मुख्यमंत्री यांच्या शर्यतीत होते. बोदवड मध्ये ते हरले आता कारण कशाला सांगत आहात. मोठ्या मनाने सांगाना आम्ही हरलो ज्याच्यात दम आहे तो निवडून येतो. मुक्ताईनगरमध्ये त्यांचे सरकार नाही, त्यांच्या गावात त्यांचे सरकार नाही. काही कारणं सांगायची आणि आपली पुंगी वाजायची, असा प्रकार खडसे यांचा सुरू असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.

इतर बातम्या:

Budget 2022 : शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांची शक्यता, पायाभूत सुविधांचा विकास, निर्यातीला प्रोत्साहन मिळणार?

27January 2022 Panchang | 27 जानेवारी 2022, गुरुवारचे पंचांग, ​​कसा जाईल दिवस?, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Shivsena leader Gulabrao Patil visit BJP Girish Mahajan in Jamner Jalgaon

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.