प्रत्येक पक्षात नारद असतात, त्यांना सांभाळलं तरच निवडणुका मविआ म्हणून लढू, गुलाबराव पाटील यांच्या निशाण्यावर कोण?

प्रत्येक पक्षात नारद असतो त्याप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील इतर पक्षातील जे नारद आहेत. त्यांना सांभाळलं तर जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या महाविकास आघाडी म्हणूनच लढल्या जातील, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

प्रत्येक पक्षात नारद असतात, त्यांना सांभाळलं तरच निवडणुका मविआ म्हणून लढू, गुलाबराव पाटील यांच्या निशाण्यावर कोण?
गुलाबराव पाटीलImage Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 10:12 PM

जळगाव : प्रत्येक पक्षात नारद असतो त्याप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील इतर पक्षातील जे नारद आहेत. त्यांना सांभाळलं तर जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या महाविकास आघाडी म्हणूनच लढल्या जातील. अशाप्रकारे बोदवड नगरपंचायत निवडणुकीचे उदाहरण समोर ठेवत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रत्यक्ष नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse ) यांच्यावर निशाणा साधलाय. मंत्री गुलाबराव पाटील हे रविवारी जळगावात आले होते. यादरम्यान अजिंठा विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सर्वांची मनं जुळली तर एकत्र लढू

आगामी काळातील जळगाव जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शिवसेना स्वबळावर लढेल किंवा महाविकास आघाडी म्हणून लढेल असा प्रश्न मंत्री पाटील यांना विचारण्यात आला. या निवडणुका या महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढण्याचा प्रयत्न करतो मात्र सर्वांची मते जुळली पाहिजेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये जर आपण बघितलं तर महाविकास आघाडी म्हणून स्वबळावर निवडणूक लढण्याबाबतचे स्थानिक पातळीवर देण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व शिवसेना हे पक्ष स्वतंत्र लढले. तरीही आगामी निवडणुकांबाबत वरिष्ठ पातळीवरूनचे आदेश येतील त्या आदेश सर्व पक्ष पाळतील अशी अपेक्षा आहे. राज्यातील नुकत्याच झालेल्या निवडणुकांमधील चित्र बघितलं तर राज्यात नगरपंचायतीच्या निवडणुक झाल्या. त्यात बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष झाले असल्याचेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रत्येक पक्षात एक नारद, गुलाबराव पाटील यांचा रोख कुणाकडे

प्रत्येक पक्षात एक नारद आहे. जळगाव जिल्ह्यातील एका पक्षामध्ये असलेल्या या नारदांना सांभाळल तर निवडणुका महाविकास आघाडी लढू शकते, असेही मंत्री पाटील यावेळी म्हणाले. गेल्या काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे व मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. बोदवड नगरपंचायतीत महाविकास आघाडी होऊ न शकल्याने तर या निवडणुकीचे उदाहरण मंत्री पाटील यांनी दिल्यामुळे नारद संबोधत नाव न घेता अप्रत्यक्षरित्या मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंना निशाणा साधला असल्याचे बोलले जात आहे.

इतर बातम्या:

J&K Attack : जम्मू कश्मीरात दहशतवाद्यांचा पुन्हा ग्रेनेड हल्ला; पोलिसासह 23 नागरिक जखमी, एकाचा मृत्यू

फडणवीसांच्या गाडीवर पिंपरीत चप्पल फेक, 24 तास पोलिसांना सुट्टी द्या, मग बघा आम्ही कुठे कुठे चप्पल…; नितेश राणे यांचा संतप्त इशारा

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.