Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Neelam Gorhe : आदित्य ठाकरे यांचे दौरे पाहता बाळासाहेब यांच्या दौऱ्यांची आठवण येते – नीलम गोऱ्हे

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत आज सकाळी प्रसारित झाली. त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांकडून त्यावर टीकास्त्र करण्यात आलं आहे.

Neelam Gorhe : आदित्य ठाकरे यांचे दौरे पाहता बाळासाहेब यांच्या दौऱ्यांची आठवण येते - नीलम गोऱ्हे
आदित्य ठाकरे यांचे दौरे पाहता बाळासाहेब यांच्या दौऱ्यांची आठवण येते - नीलम गोऱ्हेImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 1:24 PM

पुणे – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवस निमित्त त्यांचे वय जितके होते आहे. तितका म्हणजे 62 किलोचा प्रसाद आज दाखवला. सेनेच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी आज दगडुशेठ गणपतीला (Dagdusheth Ganpati) आरती केली. देशाची सेवा करण्यासाठी उद्धवजी यांना यश मिळो. देवाने त्यांना शक्ती आणि युक्ती द्यावी ही गणेशाला माझ्याकडून प्रार्थना आहे. बाळासाहेबांचे वाक्य मी ऐकल आहे की, देवाच्या देवळात येताना राजकारणाचे जोडे बाहेर काढून यायचे असतात. त्यामुळे आम्ही कोणाच्याही विरोधात जाऊन आरती करत नाही. राजकीय मतभेद असतील तरी सुद्धा ते देवाच्या दारात नाही असं शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी सांगितले.

राजकारणातील लोकांना परिपक्व बुद्धी असली पाहिजे

आदित्य ठाकरे यांचे दौरे पाहता बाळासाहेब यांच्या दौऱ्यांची आठवण येते आहे. शिवसैनिकांच्या मनामध्ये काय आहे ते ओळखूनच उद्धव ठाकरे बोलत असतात. जे मनात आहे तेच व्यक्त करण्याची परंपरा बाळासाहेबांपासून आहे. कुठलाही नेता ज्याच्या मनात जे असतं तेच बोलत असतो. म्हणूनच तो नेता असतो हे राजकारणातील लोकांना परिपक्व बुद्धी असली पाहिजे. शिवसेना हे सत्तेत असो किंवा नसो शिवसेना सगळ्यांनाच मदत करत आहे.

बावनकुळे यांना जी दिव्यदृष्टी प्राप्त झाली

बावनकुळे यांना जी दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्यांना मातोश्रीच्या आतमध्ये काय आहे ते दिसत आहे. ऊर्जामंत्री असल्यामुळे त्यांनी काही यंत्र बसवला असावा अशी टीका बावनकुळे यांच्यावरती नीलम गोऱ्हे यांनी केली. पुण्यात चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली आहे. त्यामुळे गृहविभागाला पत्र द्यायचं आहे. मात्र मंत्रीमंडळाचा विस्तार न झाल्याने अडचण निर्माण होते आहे असंही त्यांनी मीडियाला सांगितले.

हे सुद्धा वाचा

भाजपला शिवसेना संपवायची आहे

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत आज सकाळी प्रसारित झाली. त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांकडून त्यावर टीकास्त्र करण्यात आलं आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतून बंड केलेल्या आमदारांवर त्यांच्या शैलीत टीका केली आहे. तसेच भाजपला शिवसेना संपवायची आहे असा देखील आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.