बाळासाहेब, मला माफ करा, मनसेत जाऊन चूक केली, स्मृतिस्थळावर शिशिर शिंदेंच्या कान पकडून उठा-बशा
शिवसेनेत परतलेले बाळासाहेबांचे एकेकाळचे कट्टर शिलेदार शिशिर शिंदे यांनीही आज बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाऊन दर्शन घेतलं.
मुंबई : मुंबईत आज एकीकडे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती तर दुसरीकडे मनसेचं महाअधिवेशन होत आहे (Balasaheb Thackeray Birth Anniversary). मनसेच्या अधिवेशनात राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. तर दुसरीकडे शिवसैनिकांमध्ये आज वचनपूर्ती मेळाव्याची रेलचेल होत आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त दिग्गज नेते शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी वंदन करत आहेत (Balasaheb Thackeray Birth Anniversary).
शिवसेनेत परतलेले बाळासाहेबांचे एकेकाळचे कट्टर शिलेदार शिशिर शिंदे यांनीही आज बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाऊन दर्शन घेतलं. शिशिर शिंदे हे शिवसेना सोडून मनसेत गेले होते. मात्र दोन वर्षापूर्वी त्यांनी पुन्हा स्वगृही परतत शिवसेनेत प्रवेश केला (Shishir Shinde Sit-Ups).
शिशिर शिंदे हे बाळासाहेबांचे खंदे समर्थक होते. मात्र राज ठाकरे यांच्यासोबत शिवसेना सोडणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये शिशिर शिंदे यांचाही समावेश होता. शिंदे यांनी आज बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाऊन प्रायश्चित घेतलं. इतकंच नाही तर त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळासमोर चक्क कान पकडून उठाबशा काढल्या.
“आजचा दिवस आहे तो स्फूर्ती देणार आहे. या स्फूर्तीस्थळाला वंदन केलं. शिवसेनाप्रमुखांना वंदन करताना मी त्यांची माफी मागितली. मी ज्या काही चुका केल्या त्याबद्दल कान पकडून माफी मागितली. तसंच येत्या काळात आणखी काम करण्याची प्रेरणा देण्याची प्रार्थान केली”.
कोण आहेत शिशिर शिंदे?
? शिशिर शिंदे हे बाळासाहेबांचे कट्टर शिलेदार होते. मात्र त्यांनी राज ठाकरेंसोबत शिवसेना सोडली
? त्यानंतर राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून शिशिर शिंदे यांची ओळख होती.
? शिशिर शिंदे हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून गेले होते.
? 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिशिर शिंदे यांचा पराभव झाला.
? 1991 मध्ये बाळासाहेबांच्या आदेशानंतर शिशिर शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसैनिकांनी वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी खणली होती.