एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा भारी; सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?
अब्दुल भाई तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही औरंगाबादेतच येऊन देऊ. इथे बोलणार नाही. इथे फक्त आपण आप्पांच्याच गप्पा मारणार आहोत. बाकी काही म्हणारच नाही.
एरंडोल: उद्धव ठाकरे (uddhav thackeray) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) हे पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा भारी आहेत. कारण ते घटनास्थळी पोहाचण्या आधीच त्याचा कॅमेरामन तिथे पोहोचतो, असा खोचक टोला लगावतानाच मुख्यमंत्री निवडला की मॉडेल निवडले? असा संतप्त सवाल सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी केला आहे. त्या एरंडोल येथील शिवसेनेच्या सभेला संबोधित करत होत्या. यावेळी त्यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत मला काहीही तक्रार नाही. कारण या सरकारमध्ये त्यांच काहीच चालत नाही, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. तसेच उद्धव ठाकरे आजारी असताना शिंदे यांनीच 40 आमदारांची कुंडली भाजपला पुरवल्याचा आरोपही त्यांनी केला.
दादा हो, हे भांडते मी तुमच्यासाठी तुमच्या लेकरासाठी. तुमच्या शिकलेल्या मुलांच्या भवितव्यासाठी. त्या मुलांच्या भवितव्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. त्यासाठीच आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत आहे. त्यामुळे हे लोक आदित्य ठाकरेंना क्रमांक दोनचे पप्पू म्हणत आहेत, अशी टीका त्यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर नाव न घेता केली.
अब्दुल भाई तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही औरंगाबादेतच येऊन देऊ. इथे बोलणार नाही. इथे फक्त आपण आप्पांच्याच गप्पा मारणार आहोत. बाकी काही म्हणारच नाही.
काहीच बोलणार नाही. हम येत्ताच बोलेंगे, पप्पू भी बोला ना किसीने, तो पप्पू अपनेच बच्चे को बोलते है. फेकू नही बोलते अपने बच्चे को. फेकू किसको बोलते है तो गुगल सर्च करते देखो, असा चिमटा त्यांनी काढला.
आपला मुलगा असेल तर पप्पू म्हणतात आणि बदमाश असेल तर फेकू म्हणतात. त्यामुळे फेकू होण्यापेक्षा पप्पू होणं कधीही चांगलं आहे, असा पलटवार त्यांनी सत्तार यांच्यावर केला.
धनुष्यबाण आम्हालाच मिळणार असं ते सांगत असतात. धनुष्यबाण चिन्हं यांनाच मिळणार हे यांना कसं माहीत? निवडणूक आयोगांसोबत यांची काही साठगाठ आहे का?, असा सवाल त्यांनी केला.