युती होऊ किंवा नाही, शिवसेनेचा प्लॅन A आणि प्लॅन B तयार!
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनेही मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. विभागवार पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका ‘मातोश्रीव’र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे घेत आहेत. याचवेळी शिवसेनेने फॉर्म्युला A आणि फॉर्म्युला B तयार केल्याचं बोललं जात आहे. यात फॉर्म्युला A म्हणजे स्वबळावर, तर फॉर्म्युला B म्हणजे युती. अशाप्रकारे उद्धव ठाकरे यांनी खासदार, आमदार आणि जिल्हाध्यक्षांशी बोलताना संवाद सुरू […]
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनेही मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. विभागवार पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका ‘मातोश्रीव’र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे घेत आहेत. याचवेळी शिवसेनेने फॉर्म्युला A आणि फॉर्म्युला B तयार केल्याचं बोललं जात आहे. यात फॉर्म्युला A म्हणजे स्वबळावर, तर फॉर्म्युला B म्हणजे युती. अशाप्रकारे उद्धव ठाकरे यांनी खासदार, आमदार आणि जिल्हाध्यक्षांशी बोलताना संवाद सुरू केल्याचं बोललं जातंय.
शिवसेनेच्या विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, ठाणे-पालघर आणि मुंबई अशा विभागवार बैठका सुरू झाल्या आहेत. या विभागातील विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थितीत राहुन घेत आहेत. प्रत्येक मतदारसंघाचा सखोल आढावा या बैठकीत घेण्यात येतोय. तसेच विद्यमान आणि संभाव्य उमेदवारांच्या नावांचीही चर्चा बैठकीत सुरू आहे.
या जागा वाटपाच्या फॉर्म्युलाबद्दल सूत्रांनुसार, 150 जागांचा आग्रह शिवसेनेचा विधानसभेचा पूर्ण केला तर युती शक्य असल्याचं शिवसेनेचे नेते म्हणत आहेत. नाही तर 140:140 आणि उर्वरित 8 जागा मित्र पक्षांना असा फॉर्म्युला अंतिम होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीत 25 आणि 23 जागांचा फॉर्म्युला ठरला तर युतीची घोषणा दोन्ही पक्ष एकत्रित करू शकतात, असं शिवसेना-भाजप चे नेते सांगत आहेत. पण युतीबाबतचा निर्णय हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील.
याचवेळी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते युती शिवाय स्वबळावर लढाई सुरू ठेवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 15 फेब्रुवारीला जळगाव जिल्ह्यात पाचोरामध्ये सभा घेण्याचं निश्चित केल्याचं बोलत आहेत. ही सभा लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उत्तर महाराष्ट्रातून रणशिंग फुंकणार असल्याचं सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं आहे.
भाजपाध्यक्ष अमित शाहांनीही उद्धव ठाकरेंना युतीच्या चर्चेसाठी थेट फोन केल्याचं बोललं जातंय. तर शिवसेना आणि भाजपकडून स्वबळाचीही तयारी सुरु आहे. म्हणजेच जे होईल ते होईल, पण स्वबळाची तयारी ठेवा, असे आदेशच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत.