मुलाच्या डोक्यावर अक्षता टाकून बाबा फील्डवर, दादा भुसे कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांच्या भेटीला

कृषीमंत्री दादा भुसे यांचे सुपुत्र आविष्कार आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची कन्या लतीशा यांचा विवाह सोमवार 26 एप्रिल रोजी झाला (Dada Bhuse Son Wedding )

मुलाच्या डोक्यावर अक्षता टाकून बाबा फील्डवर, दादा भुसे कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांच्या भेटीला
मुलाच्या लग्नानंतर दादा भुसे कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांच्या चौकशीला
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 8:11 AM

मालेगाव : मुलाच्या लग्नाच्या दिवशीही कृषीमंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांना कर्तव्याचा विसर पडलेला नाही. मालेगावमधील सहारा कोव्हिड सेंटरमध्ये जाऊन भुसेंनी रुग्णांसाह नातेवाईकांची विचापूस केली. सुपुत्र आविष्कार भुसे यांच्या डोक्यावर अक्षता टाकल्यानंतर दादा भुसे लगेच ऑन फील्ड गेले. (Shivsena Minister Dada Bhuse in COVID Centre after Son Avishkar Bhuse Wedding with MP Rajan Vichare Daughter Latisha)

कृषीमंत्री दादा भुसे यांचे सुपुत्र आविष्कार आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची कन्या लतीशा यांचा विवाह सोमवार 26 एप्रिल रोजी झाला. मालेगावातील आनंद फार्म इथे छोटेखानी विवाह सोहळा संपन्न झाला. या लग्नाबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. ‘मोजक्या’ नातेवाईकांव्यतिरिक्त इतर वऱ्हाडी मंडळींना या विवाह सोहळ्यात ‘नो एन्ट्री’ देण्यात आली आहे. मीडियालाही या सोहळ्यात प्रवेश देण्यात आला नव्हता.

पाहा – दादा भुसे यांच्या मुलाच्या लग्नाचे फोटो

ज्या फार्म हाऊसवर हा विवाह सोहळा झाला, त्या फार्म हाऊसच्या गेटवर परवानगीशिवाय आत येऊ नये असा फलक लावण्यात आला होता. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र विशेष अतिथी आणि त्यांच्या वाहनांना परवानगी देण्यात आली.

आमदार-खासदारांच्या गाड्यांनाच केवळ एन्ट्री

राज्यातील काही आमदार, खासदार यांच्या गाड्या गेटमधून सोडण्यात आल्या. पोलीस आणि सुरक्षा पथकांचा मात्र या ठिकाणी राबता पाहायला मिळाला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून वधू वरांना शुभ आशीर्वाद दिला. तर अन्न पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या विवाह सोहळ्यात ऑनलाईन सहभागी होऊन आविष्कार आणि लतीशा यांना आशीर्वाद दिला.

नितीन राऊत यांच्या मुलाच्या रिसेप्शनला काट

याआधी, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या मुलाचं फेब्रुवारी महिन्यात लग्न झालं. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राऊत यांनी आपल्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित स्वागत समारंभ स्थगित केला होता. तसं पत्रक काढत ऊर्जामंत्र्यांनी सामाजिक भान दाखवलं होतं.

संबंधित बातम्या :

कृषीमंत्री दादा भुसेंच्या मुलाचं शिवसेना खासदाराच्या कन्येशी लग्न, गुपचूप लगीन उरकलं!

ऊर्जामंत्री नितीन राऊतांचं सामाजिक भान, कोरोनामुळे मुलाच्या विवाहाचा स्वागत समारंभ स्थगित

(Shivsena Minister Dada Bhuse in COVID Centre after Son Avishkar Bhuse Wedding with MP Rajan Vichare Daughter Latisha)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.