शिवसेनेच्या कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं?
अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटपं जाहीर झालं (Shivsena Ministers and Portfolio distribution).
मुंबई : अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटपं जाहीर झालं (Shivsena Ministers and Portfolio distribution). मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली. त्यानंतर ही यादी जाहीर करण्यात आली. यात उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय ही खाती ठेवली. तसेच इतर शिवसेना नेत्यांकडेही विविध महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत (Shivsena Ministers and Portfolio distribution).
खातेवाटप
उद्धव बाळासाहेब ठाकरे (मुख्यमंत्री) सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमुन न दिलेले विषय/खाती
एकनाथ संभाजी शिंदे नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
सुभाष राजाराम देसाई उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा
आदित्य उद्धव ठाकरे पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार
उदय रविंद्र सामंत उच्च व तंत्र शिक्षण
संजय दुलिचंद राठोड वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन
गुलाबराव रघुनाथ पाटील पाणी पुरवठा व स्वच्छता
दादाजी दगडू भुसे कृषि, माजी सैनिक कल्याण
संदिपानराव आसाराम भुमरे रोजगार हमी, फलोत्पादन
ॲड. अनिल दत्तात्रय परब परिवहन, संसदीय कार्य
शंकराराव यशवंतराव गडाख मृद व जलसंधारण
राज्यमंत्री
अब्दुल नबी सत्तार महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य
शंभुराज शिवाजीराव देसाई गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन
राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य
ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार