फडणवीसांचा जप नाही केला तर खुर्ची खेचतील… मुख्यमंत्र्यांवर कुणाचा हल्लाबोल?

शिवसेना अशी संपत नव्हती. भाजपने तुम्हाला कोर्टात पाठवले. हा भाजपचा डाव आहे. प्यादी तुम्ही आहात, असा इशारा भास्कर जाधव यांनी दिला.

फडणवीसांचा जप नाही केला तर खुर्ची खेचतील... मुख्यमंत्र्यांवर कुणाचा हल्लाबोल?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 10, 2022 | 11:43 AM

गणेश थोरात, ठाणेः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सारखं सारखं देवेंद्र फडणवीसांचं (Devendra Fadanvis) नाव घेतात. कोणतीही प्रतिक्रिया द्यायची म्हटलं तरी देवेंद्र फडणवीस आणि मी… फडणवीस आणि मी… असंच बोलत असतात. कधीतरी तुम्ही स्वतः बोला… अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर करण्यात आली आहे. शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)यांनी ही टीका केली आहे. एवढंच नाही तर याही पुढे जाऊन ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा जप केला नाही तर यांना माहितीय, एकदा माइक खेचलाय, आता खुर्चीही खेचतील…

ठाण्यात भास्कर जाधव यांनी काल एका कार्यक्रमात हजेरी लावली. कोजागिरी पौर्णिमेनिमित्तच्या या कार्यक्रमात त्यांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील बंडखोरांवर जोरदार टीका केली.

ते म्हणाले, या गद्दारांच्या विरोधात लोकांच्या मनात प्रचंड चीड आहे. शिवसेनेचं धनुष्यबाळण चिन्ह गोठवलं गेलंय. चिन्हच नाही तर या गद्दाराने पक्षाचं नाव गोठवलंय. हे 40 गद्दार महाराष्ट्राला फसवत आहेत, अशी टीका भासकर जाधव यांनी केली.

उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक संकट आली. अनेक लोक तुटून पडले. पण आतापर्यंत ते खचले नव्हते. आज मी त्यांच्या डोळ्यात अश्रू बघितले, हे योग्य नसल्याची खंत भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.

तुम्ही कितीही चेहरा लपवा, मात्र बाळासाहेबांचे आम्ही शिवसैनिक आहोत, असे वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं.

शिवसेना अशी संपत नव्हती. भाजपने तुम्हाला कोर्टात पाठवले. हा भाजपचा डाव आहे. प्यादी तुम्ही आहात, असा इशारा भास्कर जाधव यांनी दिला.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.