ज्या झाडावर वाढलात, तेच खायला निघालात, नियती सोडणार नाही, भास्कर जाधवांचा भाजपला इशारा

भाजपला नैतिकतेच्या गोष्टी तोंडातून बोलता येतात पण प्रत्यक्ष नैतिकता भाजपने कधीच पाळली नाही, असा टोला भास्कर जाधव यांनी भाजपला लगावला. (Bhaskar Jadhav Param bir Singh)

ज्या झाडावर वाढलात, तेच खायला निघालात, नियती सोडणार नाही, भास्कर जाधवांचा भाजपला इशारा
शिवसेना आमदार भास्कर जाधव
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 4:36 PM

रत्नागिरी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या संजीवनीने भाजप मोठी झाली. ज्या झाडावर तुम्ही वाढलात, ते झाडच तुम्ही खायला निघालात. त्यामुळे नियती कुणालाच सोडत नसते अला टोला शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी लगावलाय. (Shivsena MLA Bhaskar Jadhav warns BJP over Param bir Singh Letter bomb)

“मुख्यमंत्री झाला नाही, ही भाजपची खदखद”

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणावरुन शिवसेना आमदार आणि माजी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. भारतीय जनता पक्षाची दुखरी नस म्हणजे त्यांचा मुख्यमंत्री झाला नाही, ही खदखद आहे. भाजपला माहिती आहे की महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष चाललं, तर 2024 मध्ये देशात भाजप सरकार दिसणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या संजीवनीने भाजप मोठी झाली. ज्या झाडावर तुम्ही वाढलात ते झाडच तुम्ही खायला निघालात, त्यामुळे नियती कुणालाच सोडत नसते, अला इशारा आमदार भास्कर जाधव यांनी दिला.

“प्रत्यक्ष नैतिकता भाजपने कधीच पाळली नाही”

छोट्या छोट्या गोष्टीत केंद्र सरकार राज्य सरकाच्या गोष्टीत हस्तक्षेप करतंय. एटीएसचा तपास पूर्ण होत आला असताना तो तपास एनआयएकडे जाणं हेच यातून स्पष्ट होत असल्याचं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं. नैतिकतेचे धडे भाजपने आम्हाला शिकवू नयेत. गुजरातचे गृहमंत्री अमित शाह होते त्यावेळी पोलिस मुख्य डी. जी वंजारी यांनी आरोप केले होते, त्यावेळी अमित शहा यांनी राजीनामा दिला का? मोहन डेलकरांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नावं दिली, त्यांचं काय झालं? त्यामुळे भाजपला नैतिकतेच्या गोष्टी तोंडातून बोलता येतात पण प्रत्यक्ष नैतिकता भाजपने कधीच पाळली नाही, असा टोला भास्कर जाधव यांनी भाजपला लगावला.

“फडणवीस दिल्लीतून आल्यावर पत्र कसं काय पुढे आलं?”

नैतिकता दाखवण्याचं काम महाविकास आघाडीनं केलं. तुम्ही बोट दाखवाल त्याला बाहेर काढायचं ही तुमची नैतिकता आम्हाला मान्य नाही. परमबीर सिंहांच्या पत्रावर शंका उपस्थित करत त्यांनी अजून या साऱ्या प्रकरणाचा खुलासा का केला नाही? असा सवाल आमदार भास्कर जाधवांनी उपस्थित केलाय. देवेंद्र फडणवीस दिल्लीतून आल्यावर हे पत्र कसं काय पुढे आलं, यावर लवकरत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतील, असंही भास्कर जाधव म्हणाले.

नारायण राणेंवर अप्रत्यक्ष हल्लाबोल

लेटर बॉम्बवरुन हल्लबोल करणाऱ्या भाजप खासदार नारायण राणेंवर भास्कर जाधवांनी अप्रत्यक्ष हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे अलगद मुख्यमंत्री झाले, ते मुख्यमंत्री झाले हे पचनी पडत नाही. त्यामुळे झोपेतसुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले त्यांना दिसतात. मी मुख्यमंत्री झालो नाही आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असं दिसतं. त्यामुळे वाचाळवीरांच्या बोलण्याकडे महाराष्ट्र लक्ष्य देत नाही, आम्हीही देत नाही असं सांगत भास्कर जाधव यांनी नारायण राणेंना चिमटा काढलाय.

संबंधित बातम्या :

देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडले, काँग्रेसचा हल्लाबोल

खंडणीप्रकरणी देशमुखांची चौकशी करून गुन्हा दाखल करा; भातखळकरांची पोलीस ठाण्यात तक्रार

(Shivsena MLA Bhaskar Jadhav warns BJP over Param bir Singh Letter bomb)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.