मी शिवसेनेत राहू नये, असं अनेकांना वाटतंय, शिवसेनेच्या आमदाराचा मंत्र्यावर गंभीर आरोप

Gulabrao Patil | गुलाबराव पाटील यांना माझं या भागातील वर्चस्व सहन होत नाही. त्यामुळे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव घडवण्यात आला.

मी शिवसेनेत राहू नये, असं अनेकांना वाटतंय, शिवसेनेच्या आमदाराचा मंत्र्यावर गंभीर आरोप
गुलाबराव पाटील आणि चिमणराव पाटील
Follow us
| Updated on: Jul 02, 2021 | 6:14 PM

जळगाव: पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मला त्रास देत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे जळगावमधील शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. चिमणराव पाटील हे पारोळ्याचे आमदार आहेत. मी ज्येष्ठ आमदार असून स्थानिक पातळीवर माझे मत विचारात घेतले जात नाही. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्याकडून मला डावलले जाते, ही वस्तुस्थिती आहे, असे चिमणराव पाटील यांनी म्हटले त्यामुळे आता जळगावात शिवसेनेचा मंत्री विरुद्ध आमदार, असा सामना रंगण्याची शक्यता आहे. (Shivsena MLA Chimanrao Patil take a dig at jalgaon guardian minister Gulabrao Patil)

चिमणराव पाटील यांनी शुक्रवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधत आपल्या मनातील व्यथा बोलून दाखविली. गुलाबराव पाटील यांना माझं या भागातील वर्चस्व सहन होत नाही. त्यामुळे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव घडवण्यात आला. त्यानंतर अजूनही मला अनेकदा डावलण्याचा प्रयत्न होतो. मी शिवसेनेत राहू नये, असे अनेकांना वाटत असल्याचेही चिमणराव पाटील यांनी म्हटले. त्यामुळे आता गुलाबराव पाटील यावर काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

‘भाजपात दोन डझन आमदार राष्ट्रवादीचे; शिवसेनेतही बाहेरचे, आमच्यासारखे एकनिष्ठ थोडेच’

काही दिवसांपूर्वी गुलाबराव पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले होते. सर्वच पक्षात बाहेरचे लोक घुसखोरी करुन आमदार झाले आहेत. भाजपमध्ये तब्बल दोन डझन आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीतही बाहेरचे लोक आमदार आहेत, आमच्यासारखे काही थोडेच एकाच पक्षाचे एकनिष्ठ आहेत, असं गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी म्हटले होते. भाजप खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse)आणि भाजप जळगाव जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे यावेळी उपस्थित होते.

कोणीही ठामपणे सांगू शकत नाही हा माझा पक्ष आहे. सर्वच पक्षात बाहेरचे लोक घुसखोरी करुन आमदार झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात राजकीय वाद बाजूला ठेवून सर्वांनी विकासासाठी एक होण्याची गरज आहे” असे मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. भालोद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या धान्यासाठी चाळण आणि प्रतवारी यंत्रणा उभारली आहे. या प्रकल्पाला माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले.

संबंधित बातम्या:

गुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, रक्षा खडसेंचं वक्तव्य, लेकीनेही बापाने केलेल्या कामाची जाण ठेवावी, पाटलांचं प्रत्युत्तर!

36 वर्षांच्या शिवसेनेच्या प्रवासात पहिल्यांदाच घड्याळाला मतं मागतोय, शिवसेनेचा फायरब्रँड नेता पंढरपूरच्या मैदानात

भाजपात दोन डझन आमदार राष्ट्रवादीचे; शिवसेनेतही बाहेरचे, आमच्यासारखे एकनिष्ठ थोडेच : गुलाबराव पाटील

(Shivsena MLA Chimanrao Patil take a dig at jalgaon guardian minister Gulabrao Patil)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.