बोरिवली : नालेसफाई योग्यरित्या केली नसल्याचा आरोप करत शिवसेनेचे चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांनी नालेसफाई कंत्राटदारावर कचरा फेकला होता. नालेसफाईच्या मुद्द्यावरुन शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दोन दिवसांपूर्वी पाहायला मिळालं. लांडे यांनी नालेसफाई कंत्राटदाराला भर पावसात नाल्याच्या कचऱ्यात बसायला लावलं आणि आपल्या कार्यकर्त्यांना त्या कंत्राटदाराच्या अंगावर कचरा फेकण्यास सांगितलं. त्याचा व्हिडीओही व्हायरलं झाला होता. अंगावर कचरा टाकलेल्या कंत्राटदाराला आता श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे बोरिवलीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. (Dilip Lande makes a contractor sit on water logged road and dump garbage on him)
आमदार दिलीप लांडे यांनी आपल्या मतदारसंघातील नालेसफाईची शनिवारी पाहणी केली. त्यावेळी नालेसफाई योग्यरित्या झाली नसल्याचं सांगत त्यांनी नालेसफाई कंत्राटदाराला चक्क नाल्यातील कचऱ्यावर बसवलं. इतकंच नाही तर या कंत्राटदाराच्या अंगावर नाल्यातील कचराही टाकला. त्यानंतर नालेसफाई कशी केली जाते हे सांगण्यासाठी शिवसैनिकांनी नाल्यातील कचरा आणि गाळ काढला. पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईवर अमाप खर्च केल जातो. मात्र, योग्यरित्या नालेसफाई होत नसल्याचं नाल्या तुंबल्याचं, नाल्यातील घाण पाणी रस्त्यांवर, अनेकांच्या घरात घुसल्याचं चित्र दरवर्षी पाहायला मिळतं. अशावेळी दिलीप लांडे यांनी नालेसफाई कंत्राटदाराला दाखवलेल्या हिसक्याची चांगलीच चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, नालेसफाई न झाल्यामुळेच त्या कंत्राटदाराला त्याची जागा दाखवली अशी प्रतिक्रिया आमदार दिलीप लांडे यांनी दिली आहे.
#WATCH | Mumbai: Shiv Sena MLA from Chandivali, Dilip Lande makes a contractor sit on water logged road & asks workers to dump garbage on him after a road was waterlogged due to improper drainage cleaning
He says, “I did this as the contractor didn’t do his job properly” (12.6) pic.twitter.com/XjhACTC6PI
— ANI (@ANI) June 13, 2021
मुंबईत नालेसफाई झालीच नाही. नाल्यात गाळ रुतलेला आहे. गाळाचं बेटं तयार झाली आहेत. नाल्यावर शेती करावी अशी झाडं-झुडपं अभी आहेत. 100 टक्के नालेसफाईचा दावा हा बिलं काढण्यासाठी आहे. मुंबईच्या नालेसफाईत आता कट आणि कमिशन दोन्ही सुरु झालं आहे. यात प्रशासनाचे अधिकारीही जबाबदार आहे. पी. वेलारासू नावाचा राक्षस पालिका अधिकारी म्हणून फिरत आहे. तो आ वासून स्वत:ची वाहवा करत आहे. महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यांचं त्याला समर्थन आहे, अशी घणाघाती टीका शेलार यांनी केलीय. तसंच यांना मुंबईकरांसमोर उघडं करणं हे भाजपचं काम असल्याचं शेलार म्हणालेत.
Video | Abdul Sattar | मविआ सरकारचे मुख्यमंत्री म्हणून 5 वर्ष उद्धव ठाकरे हेच राहतील : अब्दुल सत्तार#AbdulSattar #UddhavThackeray #ShivSena #MahaVikasAghadi
अन्य बातम्या, व्हिडीओ पाहा – https://t.co/BV9be230nv pic.twitter.com/fqfuETI1ru
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 14, 2021
इतर बातम्या :
VIDEO: कोण आहेत ते तुषार भोसले? अजित पवारांनी जेव्हा भाजपच्या वारकरी नेत्याला जागा दाखवली!
‘दोन्ही राजे एकत्र आले त्याचं स्वागत, पण त्यांचं बोलणं भाजपच्या मिठाला जागल्यासारखं’, शिवसेनेचा टोला
Dilip Lande makes a contractor sit on water logged road and dump garbage on him