जळगावातील शिवसेनेच्या आमदाराचे जात प्रमाणपत्र रद्द, आमदारकी धोक्यात?

त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. (Shivsena MLA Lata Sonawane Caste Certificate declare invalid)

जळगावातील शिवसेनेच्या आमदाराचे जात प्रमाणपत्र रद्द, आमदारकी धोक्यात?
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 9:40 AM

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघाच्या आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे यांचे आमदारपद धोक्यात आले आहे. लताबाई सोनावणे यांचे टोकरे कोळी अनुसुचित जमातीचा उल्लेख असणारे प्रमाणपत्र नंदूरबारमधील प्रमाणपत्र तपासणी समितीने अवैध ठरवले आहे. माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. (Shivsena MLA Lata Sonawane Caste Certificate declare invalid)

जळगावातील चोपडा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव होता. या ठिकाणाहून लताबाई चंद्रकांत सोनवणे या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी लताबाई यांच्या अनुसूचित जमातीचा दावा करणाऱ्या प्रमाणपत्राबद्दल उपसंचालक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार यांच्याकडे तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर समितीसमोर सुनावणी करण्यात आली. मात्र या समितीने काहीही निकाल न वळवी यांनी उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायलयाने संबंधित त्रिसदस्यीय समितीला लवकरात लवकर आदेश द्या, असे खडसावले होते.

त्यानुसार तपासणी समितीने बुधवारी (4 नोव्हेंबर) याबाबत निकाल देत लताबाई चंद्रकांत सोनवणे यांचे अनूसुचित प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. तसेच ते रद्द करण्यात येत असल्याचे नमूद केले आहे.

या निकालामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. या निकालामुळे त्यांची आमदारकीचे काय? अशी चर्चा सध्या रंगली आहे. दरम्यान या निकालाविरोधात औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार असल्याची माहिती सोनवणे यांच्या स्वीय सहाय्यक यांनी दिली आहे. (Shivsena MLA Lata Sonawane Caste Certificate declare invalid)

संबंधित बातम्या : 

राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर संधी, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

यशपाल भिंगेना विधानपरिषद, राष्ट्रवादीचे एकाच दगडात दोन निशाणे

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.