‘गोपीचंद पडळकर बांडगुळ, अशी बांडगुळं वाढत आहेत’, शिवसेना आमदार मनिषा कायंदेंचा घणाघात

मोठ्या माणसांची नावं घेतली की आपलं नाव मोठं होतं असं पडळकरांना वाटतं. गोपीचंद पडळकर हे बांडगुळ आहेत आणि अशी बांडगुळं वाढत आहेत, अशी घणाघाती टीका मनिषा कायंदे यांनी केलीय.

'गोपीचंद पडळकर बांडगुळ, अशी बांडगुळं वाढत आहेत', शिवसेना आमदार मनिषा कायंदेंचा घणाघात
शिवसेना आमदार मनिषा कायंदे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 4:58 PM

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेला आमदार मनिषा कायंदे यांनी जोरदार टीका केलीय. गोपीचंद पडळकर हे बांडगुळ आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच जातीपातीवर मतं मागितली नाहीत. कधी जातीचं राजकारण केलं नाही. मोठ्या माणसांची नावं घेतली की आपलं नाव मोठं होतं असं पडळकरांना वाटतं. गोपीचंद पडळकर हे बांडगुळ आहेत आणि अशी बांडगुळं वाढत आहेत, अशी घणाघाती टीका मनिषा कायंदे यांनी केलीय. (ShivSena MLA Manisha Kayande criticizes BJP MLA Gopichand Padalkar)

गोपीचंद पडळकरांचं राऊतांवर टीकास्त्र

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केलीय. संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा आहे. अशा भाटांची धनगर समाजाला आवश्यकता नाही, अशी बोचरी टीका भाजपचे विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. संजय राऊत खातात शिवसेनेचं पण जागतात पवारांच्या निष्ठेला, असा टोलाही पडळकरांनी लगावलाय. ते रविवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला

तत्पूर्वी संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावर महाविकास आघाडी सरकारला दिलेल्या आव्हानावरुन टोला लगावला होता. देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असंच वक्तव्य केलं होतं. ते मला चांगलं आठवत आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये, असा टोला राऊत यांनी फडणवीसांना लगावलाय.

देवेंद्र फडणवीसांचं ठाकरे सरकारला आव्हान

पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वांच्या शहरांत तसंच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावं, यासाठी भाजपने एल्गार केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडलं. नागपूरमधल्या आंदोलनात फडणवीसांना ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. खास करुन त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. ओबीसी आरक्षणाचा मारेकरी काँग्रेसच आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय. पण माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं फडणवीस म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

राजकारणातील मंडळीना अशी भीती दाखवायला लागले तर लोकशाहीच संपुष्टात येईल, देशमुखांवरील कारवाईवरुन जयंत पाटलांचा केंद्रावर निशाणा

ओबीसींना 4 महिन्यांत आरक्षण मिळवून देईन, फडणवीसांच्या गर्जनेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

ShivSena MLA Manisha Kayande criticizes BJP MLA Gopichand Padalkar

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.