Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena : “शिवसेनेत भांडणं लावून राष्ट्रवादी मजा पाहतेयत”, आमदार संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप

द्धव ठाकरे यांच्यासह शरद पवारांनी सरकार टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अश्यात शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत.

Shivsena : शिवसेनेत भांडणं लावून राष्ट्रवादी मजा पाहतेयत, आमदार संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 11:52 AM

मुंबई : “शिवसेनेत भांडणं लावून राष्ट्रवादी मजा पाहतेयत”, असा गंभीर आरोप आमदार संजय शिरसाट (Shivsena MLA Sanjay Shirsat) यांनी केला आहे. “गुवाहाटीमध्येही बैठका होतायत. पत्रव्यवहारांची माहिती इथल्या आमदारांना दिली जातेय. उपाध्यक्षांबाबत अविश्वास पाठवला जातोय. राष्ट्रवादीला वाटतयं की बंडखोरांना कायद्याच्या कचाट्याच आम्हाला ते अडकू पाहतील. पण हे सगळं नियमबाह्य आहे. त्यांनी तसं केलंच, तर त्यांना आम्ही उत्तर देऊच. यापूर्वी कधीही राष्ट्रवादीचे कोणतेही नेते शिवसेना भवनाची पायरी चढताना पाहिलेली नाही. राष्ट्रवादीच्या मार्गदर्शनाखालीहा पक्ष चालतोय की काय, अशी आम्हाला शंका येतेय. शिवनेसा आमचीच आहे. राष्ट्रवादी शिवसेनेत भांडण लावून मजा पाहतेय”, असं म्हणत संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीवर (NCP) गंभीर आरोप केले आहेत. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

“जे काही निधी मिळाला, तो एकनाथ शिंदेंकडून मिळला, म्हणून आमची कामं झाली. रेकॉर्डवर आहे सगळं. ज्या मतादारांनी आम्हाला निवडून दिलं, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला ठोस निधी दिला गेला नाही, म्हणून नाराजी आहे. आम्ही विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव कुणालाही देणार नाही. आमचा गट ठाम आहे. नियमानुसार आम्ही कोणत्याही पक्षात जाणार नाही. पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे. आम्ही त्यांना आदर करतो. ते जे बोलले, त्यावर कमेंट करण्याइतका मी मोठा नाही. त्यांनी आमची साथ दिली तर आम्ही जाऊ त्यांच्यासोबत. पण ते आमच्यावरच कारवाई करत आहेत. आमचं ऐकतच नाहीत, हेच आमचं दुखणं आहे”, असं संजय शिरसाटही यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेत सध्या उभी फूट पडली आहे. अश्यात उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवारांनी सरकार टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अश्यात शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत.

एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.