Aurangabad | संभाजीनगरला राष्ट्रवादीचाच खोडा, आता उद्धव ठाकरेंची भूमिका काय? संजय शिरसाट यांचा सवाल!

राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधताना संजय शिरसाट म्हणाले, ' आम्हाला राष्ट्रवादीचीच नेहमी अडचण होत आली आहे. दर वेळा ते आडवी आलेले आहे. हिंदुत्वाची भावना घेऊन शिवसेना पुढे जात आहे, साहेबांना अपेक्षित असलेला संभाजीनगर आम्हाला पाहायचा आहे.

Aurangabad | संभाजीनगरला राष्ट्रवादीचाच खोडा, आता उद्धव ठाकरेंची भूमिका काय? संजय शिरसाट यांचा सवाल!
संजय शिरसाट, शिवसेना आमदारImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 3:31 PM

औरंगाबादः औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर (Sambhajinagar) करण्याच्या राज्य सरकारने मंजूर केलेल्या प्रस्तावाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. हे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्याच (NCP) पदाधिकाऱ्याने  दिले आहे. ज्या महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) शिवसेनेसोबत राष्ट्रवादी एकत्र नांदते, त्याच पक्षातील नेत्याने शिवसेनेच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे. यावर आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची काय भूमिका आहे, असा सवाल शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे गटात गेलेले आमदार असून राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच शिवसेनेची अशी स्थिती झाल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. संभाजीनगराच्या नामांतर प्रक्रियेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच आड येत असल्याचं त्यांनी दाखवून दिलं.

‘संभाजीनगर झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’

आमदार संजय शिरसाट म्हणाले, ‘ कालच मला कळालं की संभाजीनगर या नाव संदर्भात हाय कोर्टात याचिका टाकलेली आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे .संभाजीनगरचा प्रश्न हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी ठेवलेले हे नाव आहे. म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी नगर हा ठराव घेतला आहे. तरीही या राष्ट्रवादीच्या लोकांनी त्याला खो घालण्याचा प्रयत्न केलेला आहे .हीच राष्ट्रवादी ज्यांच्यामुळे आम्ही आज जो उठाव केला होता. माझा थेट प्रश्न आहे माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना आता या राष्ट्रवादीने संभाजीनगरला विरोध केलेला आहे तुमची भूमिका काय?

संजय राऊत ओरडतो, त्याची भूमिका काय?

संभाजीनगरच्या नामांतराविरोधात राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्याने याचिका दाखल केली आहे. आता नेहमी शिंदे गटाविरोधात ओरडणाऱ्या संजय राऊत यांची भूमिका काय आहे, असा सवालही संजय शिरसाट यांनी केला आहे.

राष्ट्रवादीच नेमही आडवी येते…

राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधताना संजय शिरसाट म्हणाले, ‘ आम्हाला राष्ट्रवादीचीच नेहमी अडचण होत आली आहे. दर वेळा ते आडवी आलेले आहे. हिंदुत्वाची भावना घेऊन शिवसेना पुढे जात आहे, साहेबांना अपेक्षित असलेला संभाजीनगर आम्हाला पाहायचा आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील यावर कडवट भूमिका घेतली पाहिजे. आतादेखील तुम्हाला राष्ट्रवादी बरोबर राहायचं तर रहा परंतु संभाजीनगरचं नाव आम्हाला द्या अशी आमची विनंती..

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....