मुंबई : कोरोना रुग्णांची स्थिती उघड्या डोळ्यांना न पाहावल्याने स्वत:ची 90 लाखांची एफडी मोडून राजकारण्यांमध्ये अजूनही ‘माणुसकी’ आणि ‘संवेदनशीलता’ शिल्लक आहे, हे दाखवून देणारे कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लिप एका कट्टर काँग्रेस कार्यकर्ता आणि आमदार संतोष बांगर यांच्याधल्या संवादाची आहे. आमदार बांगर यांच्या कामाने भारावून गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्याने त्यांच्याकडे मदत मागितली आणि आमदारसाहेबांनी ज्या प्रकारे धीर दिला ते पाहूनच कार्यकर्त्याच्या तोंडातून आमदारांसाठी कधी ‘देवमाणूस’ शब्द निघाला, हे त्यांनाही कळालं नाही.! (ShivSena MLA Santosh Bangar and Congress Worker Audio Clip Viral On Social media)
काँग्रेस कार्यकर्त्याने आपल्या वडिलांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन पाहिजे म्हणून आमदार संतोष बांगर यांना फोन लावला. रात्री 12 वाजताच्या दरम्यान त्याने आमदारसाहेबांना फोन लावला. आमदारसाहेबांनीही दोन रिंगमध्ये फोन उचलला. कार्यकर्त्याने आपली व्यथा आमदारांसमोर मांडली. त्यांनीही अगदी आपुलकीने कार्यकर्त्याला आश्वस्त केलं, वडिलांची विचारपूस केली आणि अजिबातच काळजी करु नका, कसलीही अडचण आली की कधीही फोन करा, असा धीर दिला. आमदारांच्या माणुसकीच्या अनुभवाने कट्टर काँग्रेस कार्यकर्त्याच्या तोंडूनसाहजिकच शिवसेना आमदारासाठी देवमाणूस शब्द आला.
काँग्रेस कार्यकर्ता : हॅलो साहेब मी गजाजन देशमुख बोलतोय, रात्री तुम्हाला फोन केला होता… वडिलांना कोरोनामुळे तिरुपती लॉन्सला अॅडमिट केलं आत्ता… डॉक्टर सांगत आहेत की रेमडेसिव्हिर इंजेक्शनची सोय करा, त्यामुळेच तुम्हाला फोन केला होता…
आमदार संतोष बांगर : संध्याकाळपर्यंत आपले इंजेक्शन डॉक्टरपाशीच पोहोचतील. आपण हजार डोस देतोय. संध्याकाळपर्यंत इंजेक्शन डॉक्टरांपर्यंत पोहोचतील…
काँग्रेस कार्यकर्ता : बरं बरं… तुमचे खूप खूप धन्यवाद साहेब…
आमदार संतोष बांगर : काही काळजी करु नका…
काँग्रेस कार्यकर्ता : रात्रीच्या 12 वाजता एका रिंगमध्ये तुम्ही फोन उचलला साहेब… आम्हाला अपेक्षा होती… तुम्ही आमच्या मनामध्ये खूप मोठं घर केलं साहेब…
आमदार संतोष बांगर : धन्यवाद धन्यवाद ….
काँग्रेस कार्यकर्ता : शेवटी माणसाला सोबत काय घेऊन जायचंय… फक्त विश्वास देणारी माणसं हवीत… साहेब मी एकनिष्ठ काँग्रेसचा माणूस आहे, पण तुमच्याकडून अपेक्षा होती, म्हणून तुम्हाला फोन लावला.
आमदार संतोष बांगर : व्वा व्वा व्वा धन्यवाद धन्यवाद….
काँग्रेस कार्यकर्ता : विजू पाटलांनी मला सांगितलं, साहेबांना फोन लावा, म्हणून तुम्हाला फोन लावला…
आमदार संतोष बांगर : संध्याकाळी जर तुम्हाला नाही भेटले इंजेक्शन तर मला पुन्हा फोन करा…
काँग्रेस कार्यकर्ता : बरं बरं साहेब
आमदार संतोष बांगर : वडिलांचा स्कोअर किती आहे?
काँग्रेस कार्यकर्ता : साहेब 7 आहे
आमदार संतोष बांगर : ठीक आहे, काही अडचण नाही, काळजीचं कारण नाही 7 आहे म्हणजे नॉर्मल आहे…
काँग्रेस कार्यकर्ता : वडिलांचं बायपास झालेलं असल्यामुळे जरा काळजी वाटत होती…
आमदार संतोष बांगर : काही काळजी करु नका, तुम्हाला जे कोणते डोस लागतील, ते जर संध्याकाळपर्यंत नाही मिळाले, तर मी देतो, काही काळजी करु नका…
काँग्रेस कार्यकर्ता : तुमच्यासारखे देवमाणसं भेटली ना सगळ्यांना तर खूप काही चांगलं होईन साहेब…
आमदार संतोष बांगर : चला, काही काळजी करु नका, टेन्शन घेऊ नका
काँग्रेस कार्यकर्ता : साहेब आज कुणी फोन उचलायला तयार नाही…
आमदार संतोष बांगर : तुम्ही मला कधीही फोन करा, फक्त बैठकीत असेल तर राम फोन घेईन…
(ShivSena MLA Santosh Bangar and Congress Worker Audio Clip Viral On Social media)
हे ही वाचा :
रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी सेनेच्या आमदारानं स्वत:ची एफडी मोडली, 5 हजार इंजेक्शन पुरवणार
AUDIO | 20 मिनिटात गाडी पाठव, नाही तर पेट्रोल टाकून फुकून देईन, शिवसेना आमदाराची ऑडिओ क्लीप व्हायरल