Maharashtra Assembly Session : 13 दिवसानंतर शिवसेनेच्या आणखी एका आमदाराचं बंड, काल साळवींना मत, आज शिंदेंना पाठिंबा

Maharashtra Assembly Session : संतोष बांगर हे शिवसेनेचे हिंगोलीतील आमदार आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत राजकीय भूकंप घडवून आणल्यानंतरही ते शिवसेनेतच होते. उद्धव ठाकरे यांना सोडून कुठेही जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

Maharashtra Assembly Session : 13 दिवसानंतर शिवसेनेच्या आणखी एका आमदाराचं बंड, काल साळवींना मत, आज शिंदेंना पाठिंबा
13 दिवसानंतर शिवसेनेच्या आणखी एका आमदाराचं बंडImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 11:04 AM

मुंबई: शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (santosh bangar) यांनी तब्बल 13 दिवसानंतर बंड केलं आहे. कालपर्यंत शिवसेनेसोबत असलेले बांगर आज शिंदे गटात सामील झाले आहे. त्यामुळे शिवसेनेला (shivsena) मोठा धक्का बसला आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत संतोष बाांगर यांनी शिवसेनेच्या राजन साळवींना (rajan salvi) मतदान केलं होतं. आज मात्र, त्यांनी थेट शिंदे गटात उडी घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आज सकाळीच बांगर ताजमध्ये पोहोचले. शिंदे यांच्याशी चर्चा केली आणि विधानसभे जाणाऱ्या शिंदे गटाच्या बसमध्येही बसले. त्यामुळे आता शिंदे गटाकडील शिवसेनेच्या आमदारांची संख्या 40 झाली आहे. विश्वासदर्शक ठरावाला अवघा अर्धा तास बाकी असतानाच बांगर यांनी गट बदलल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सध्या तरी शिंदे गटाची बाजू भक्कम दिसत आहे.

संतोष बांगर हे शिवसेनेचे हिंगोलीतील आमदार आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत राजकीय भूकंप घडवून आणल्यानंतरही ते शिवसेनेतच होते. उद्धव ठाकरे यांना सोडून कुठेही जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच शिंदे यांच्या बंडानंतर झालेल्या शिवसेनेच्या प्रत्येक बैठकीला बांगर उपस्थित होते. बांगर यांनी बंडखोरांवर प्रचंड टीकाही केली होती. बांगर जेव्हा हिंगोलीत गेले तेव्हा त्यांचा शिवसैनिकांनी सत्कार केला होता. जल्लोषात स्वागत केले होते. त्यानंतर बांगर यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरांच्या निषेधार्थ हिंगोलीत मोठी आंदोलने झाली होती. शिंदे गटातील बंडखोरांचे पुतळेही जाळण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

कालपर्यंत शिवसेनेसोबत

संतोष बांगर कालपर्यंत शिवसेनेसोबत होते. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेकडून राजन साळवी उभे होते. त्यावेळी बांगर यांनी साळवी यांना मतदान केलं. मात्र, आज विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर बांगर यांनी थेट गट बदलत शिंदे गटात सामील झाले आहेत. सकाळीच ते हॉटेल ताज प्रेसिडेंसीमध्ये पोहोचले. तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून बसमधून विधानभवनातही आले. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.

आमदारकी धोक्यात आल्याने शिंदे गटात?

दरम्यान, काल उशिरा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून मान्यता दिली आहे. शिवसेनेचे सुनील प्रभू यांचे प्रतोपद आणि अजय चौधरी यांचे गटनेतेपद रद्द केले आहे. त्यामुळे शिंदे गटाकडे व्हीप देण्याचा अधिकार आला आहे. शिंदे गटाचा व्हीप हा शिवसेनेच्या सर्वच्या सर्व 16 आमदारांना लागू होणार आहे. हा व्हीप न पाळल्यास या आमदारांची आमदारकीही जाऊ शकते. त्याच भीतीमुळे बांगर शिंदे गटात आल्याचं सांगितलं जात आहे. आमदारकी वाचवण्यासाठी बांगर यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

संख्याबळ वाढलं

शिंदे गटाकडे शिवसेनेचे 39 आमदार आहे. आताही संख्या एकने वाढून 40 झाली आहे. तर शिवसेनेकडील आमदारांची संख्या 16 वरून १५ वर आली आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळाली होती. आता ही संख्या 165 झाली आहे. ही संख्या अजूनही वाढणार असल्याचा कालच भाजपने दावा केला होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.