शिवसेना आमदार उदय सामंत यांच्या नावापुढे आता ‘डॉक्टर’

पुण्याच्या अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून आमदार उदय सामंत यांना 'डॉक्टरेट' पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

शिवसेना आमदार उदय सामंत यांच्या नावापुढे आता 'डॉक्टर'
Follow us
| Updated on: Nov 20, 2019 | 11:23 AM

मुंबई : म्हाडाचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. पुण्याच्या अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून आमदार उदय सामंत यांना ‘डॉक्टरेट’ पदवी प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांची ओळख आता डॉ. उदय सामंत (Shivsena MLA Uday Samant) अशी होईल.

उदय सामंत यांनी गेल्या 20 वर्षात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘डॉक्टरेट’ प्रदान करण्यात येणार आहे. जानेवारी 2020 मध्ये उदय सामंत यांना अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी प्रदान केली जाईल. ‘सामना’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

उदय सामंत हे गेली 20 वर्ष राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. युवकांचे नेतृत्व करत असताना युवा महोत्सव, क्रिकेट स्पर्धांसह शैक्षणिक उपक्रम त्यांनी सुरु केले होते.

2004 मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर आमदारपदी निवडून आले. त्यानंतर सलग चारवेळा (2004, 2009, 2014, 2019) आमदार होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून ते आमदारपदी निवडून येत आहेत. 2013 मध्ये उदय सामंत यांना नगरविकास विभागाचं राज्यमंत्रिपद मिळालं. 2018 मध्ये त्यांची ‘म्हाडा’च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

महासेनाआघाडी किंवा युती, शिवसेनेशिवाय सत्तास्थापन होऊ शकत नाही : दिवाकर रावते

राजकारणात विविध पदांवर काम करत त्यांनी राजकीय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या या कार्याची दखल घेत अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, आमदार जितेंद्र आव्हाड या राजकीय नेत्यांनाही यापूर्वी अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी दिली आहे. आता उदय सामंत यांच्या रुपाने (Shivsena MLA Uday Samant) आणखी एका राजकीय नेत्याची भर पडली आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.