कोल्हापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीमधील एकाही कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला, तरी गाठ शिवसेनेशी आहे, असा इशारा हातकणंगलेचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात भीमाशंकर पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा मानेंनी समाचार घेतला (Dhairyasheel Mane warns Bhimashankar Patil).
‘गेल्या 64 वर्षांपासून महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी कायदेशीररित्या आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात बेजबाबदार, बेताल वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर पाटील यांना मी सांगू इच्छितो “कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात याची तारीख आणि वेळ सांगा, पाहूया तुमच्या गोळ्या कमी पडतात की आमची माणसं, याचे उदाहरण घालून देऊ” असा इशारा धैर्यशील माने यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिला आहे.
‘आजवर महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलेले आहे. भीमाशंकर पाटील यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी तसे सांगावे, आजही महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी निधड्या छातीने गोळ्या झेलायला लाखो उभे राहतील, पण कर्नाटकातील वंचितांना महाराष्ट्रात आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत हे ध्यानात ठेवावे.’ असं धैर्यशील माने यांनी बजावलं.
भीमाशंकर पाटील काय म्हणाले?
भाषावार प्रांतरचनेवेळी कर्नाटकात अडकलेल्या सीमाभागातील मराठी भाषिक आणि हा लढा तेवत ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर उभे करुन गोळ्या घाला, असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केलं होतं.
मराठी भाषिकांवरील अन्याय, अत्याचाराचा संदर्भ देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनात बेळगावसह सीमाभाग पाकिस्तानमध्ये आहे का? असा सवाल भर सभागृहात केंद्र सरकारला केला होता. त्या पार्श्वभूमीवर एका कन्नड संघटनेच्या नेत्याने मराठी भाषिकांना थेट गोळ्या घालण्याची भाषा केल्याने सीमाभागात संतप्त पडसाद उमटले आहेत. त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला जात आहे. Dhairyasheel Mane warns Bhimashankar Patil
संबंधित बातम्या :
नवनीत राणांच्या बाजूला; स्मृती इराणींच्या कुशीत; सोनियांसोबत उभी; धैर्यशील मानेंच्या लेकीचं फोटोसेशन