Video : “आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेते? पवार सरकार”, सेना खासदार गजानन किर्तीकरांच्या वक्तव्यानं खळबळ

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिर्दे येथे ब्राम्हणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन समारंभाला खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) उपस्थित होते.

Video : “आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेते?  पवार सरकार”, सेना खासदार गजानन किर्तीकरांच्या वक्तव्यानं खळबळ
गजानन किर्तीकर यांच्या वक्तव्यानं खळबळImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 9:16 PM

रत्नागिरी: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिर्दे येथे ब्राम्हणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन समारंभाला खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) उपस्थित होते. एका आमदाराला त्याच्या मतदार संघात विकास कामासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात, असं किर्तीकर म्हणाले. विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळ केली जात असून ग्रामविकास मंत्रालयाच्या 25 /15 योजनेमधून निधी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा पाहावयास मिळते. आम्हाला मुंबईमध्ये हा प्रश्न उद्भवत नाही, मुंबईमध्ये नागरोत्थान, नगरविकासचा निधी मिळतो, मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवितो. मात्र, निधीची पळवापळवी केली जात असून “ आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेतो, पवार सरकार” असे म्हणत त्यांनी निधी वाटपात शिवसेनेवर (Shivsena) अन्याय होत असल्याने नाराजी व्यक्त केली.

पाहा व्हिडीओ:

किर्तीकर यांच्या वक्तव्यानं खळबळ

शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनीही रायगड जिल्ह्यात एका सभेत यापूर्वी महाविकास आघाडीवर टीका केली होती, त्यानंतर शिवसेनेचे नेते व खासदार गजानन किर्तीकर यांनीही आता महाविकास आघाडीबद्दल नाराजी व्यक्त केल्याने या आघाडीत सर्वच आलबेल नाही असे दिसून येत आहे. आता, केवळ “आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेते, पवार सरकार” असे म्हणत शिवसेनेचे मुंबईतील खासदार व शिवसेनेचे नेते गजानन किर्तीकर यांनी निधी वाटपाबाबत नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीला सरकारला घरचा आहेर दिल्याने खळबळ उडाली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातही सर्वात जास्त निधी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खात्यांना त्यानंतर कॉग्रेसच्या मंत्रांच्या खात्यांना व सर्वात शेवटी अर्थसंकल्पातील केवळ 16 टक्के निधी शिवसेनेच्या मंत्र्याच्या खात्यांना मिळाला असल्याची टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती.

गजानन किर्तीकर योगेश कदम यांच्या पाठिशी

ते म्हणाले कि अंतर्गत भेदीही खूप आहेत त्यांचाही त्रास होतो, हा त्रास मुंबई शहरात एवढा होत नाही. मात्र, इकडे जास्त आहे असे म्हणत त्यांनी तुला तो भोगायला लागते आहे असे त्यांनी योगेश कदम यांना सांगितले. आपण तुझ्या पाठीशी आहोत असा धीरही त्यांनी आमदार योगेश कदम यांना दिला. या कार्यक्रमात खासदार किर्तीकर यांच्या हस्ते आमदार योगेश कदम यांचा सत्कारही करण्यात आला. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्यातील मोबाइलवरील कथित संभाषण उघड झाल्यावर शिवसेनेतून रामदास कदम व त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांना कॉर्नेर करण्याचा प्रयत्न केला जात असून दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निवडीचे अधिकार आमदार योगेश कदम यांना न देता ते माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना देण्यात आले होते. योगेश कदम यांच्या गटाचे असलेले शिवसेनेचे तालुकाध्यक्ष, उपजिल्हाप्रमुख, विधासभा क्षेत्र प्रमुख यांची उचलबांगडी करून तेथे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या गटाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पालकमंत्री अनिल परब यांनी केली होती. त्यामुळे योगेश कदम यांना पक्षांतर्गत विरोधाला तोंड द्यावे लागत असल्याचं चित्र आहे.

इतर बातम्या :

गिरीश महाजनांच्या मुलीच्या लग्नाला दिग्गजांची उपस्थिती, नेत्यांचे हितगुजाचे फोटो चर्चेत

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.