Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावचा विकास करायचाय, कोरोनाचे नियम पाळून ग्रामसभा घेऊ द्या, सेना खासदाराची राज्य सरकारकडे मागणी

ग्रामीण विकासाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ग्रामसभा अत्यंत महत्वाची असून ग्रामसभा घेण्यासाठी राज्य सरकारने कोरोनाचे नियम पाळत आणि शासन निर्णयानुसार परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे.

गावचा विकास करायचाय, कोरोनाचे नियम पाळून ग्रामसभा घेऊ द्या, सेना खासदाराची राज्य सरकारकडे मागणी
शिवसेना खासदार हेमंत पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 7:55 AM

नांदेड :  ग्रामीण विकासाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ग्रामसभा अत्यंत महत्वाची असून ग्रामसभा घेण्यासाठी राज्य सरकारने कोरोनाचे नियम पाळत आणि शासन निर्णयानुसार परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेना खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांनी केली आहे.

गावाच्या विकासासाठी ग्रामसभा घेणं महत्त्वाचं

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्य सरकारने शासकीय किंवा निमशासकीय सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेण्यास निर्बंध आणले होते. त्यामुळे गतवर्षांपासून ग्रामसभा घेणे सुद्धा बंद करण्यात आले होते. त्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास काही प्रमाणात मंदावला आहे.

ग्राम विकासासाठी ग्रामसभा अत्यंत महत्वाची आहे, असं सांगत ग्रामपंचायत कोरोनाचे नियम पाळतील, पण त्यांना ग्रामसभा घेण्याची परवानगी द्या, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे.

कोरोनाचे नियम पाळतो पण ग्रामसभेला परवानगी द्या

कोरोना प्रादुर्भावामुळे गतवर्षापासून ग्रामसभा घेणं सुद्धा बंद करण्यात आले होते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत DPR बनविण्याचे काम, 15 व्या वित्त आयोगातील आराखडे तयार करणे, गावातील नागरिकांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना, रोजगार हमी योजना कामाच्या निवडीचे लेबर व बजेट मंजुरी वनहक्क दावे मंजूर करणे, यासह इतर विकासात्मक कामे खोळंबली आहेत.

त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामसभा या राज्य  शासनाच्या नियमानुसार आणि कोरोनाचे नियम पाळून घेण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी मागणी केली आहे.

(Shivsena MP Hemant patil demand restart Gramsabha to CM Uddhav Thackeray)

हे ही वाचा :

अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश, आता नांदेडवरुन विमानाने तिरुपतीला जाता येणार, पाहा फ्लाईटचं टाईम-टेबल

नांदेड जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या शंकरराव चव्हाण यांचा सन्मान, विष्णुपुरी जलाशयाजवळ स्मारक होणार

स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.