“चंद्रशेखर बावनकुळेंनी इतका भ्रष्टाचार केला की त्यांना तिकीटच दिलं नाही”

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री असताना इतका भ्रष्टाचार केला की त्यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीटच दिलं नाही, असा टोला शिवेसना खासदार प्रतापराव जाधव यांनी लगावलाय.

चंद्रशेखर बावनकुळेंनी इतका भ्रष्टाचार केला की त्यांना तिकीटच दिलं नाही
चंद्रशेखर बावनकुळे, नेते, भाजप
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 5:27 PM

बुलडाणा : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवणाऱ्या भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी खामगावमध्ये बोलताना शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. शिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष असल्याचा घणाघात बावनकुळेंनी केला होता. त्याला उत्तर देताना बावनकुळे यांनी मंत्री असताना इतका भ्रष्टाचार केला की त्यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीटच दिलं नाही, असा टोला शिवेसना खासदार प्रतापराव जाधव यांनी लगावलाय. (Prataprao Jadhav criticizes Chandrasekhar Bavankule)

बावनकुळे हे आता शिवसेनाविरोधात गरळ ओकून पक्षात आपलं महत्व वाढवण्याचा आटापिटा करत आहेत. मात्र बावनकुळेंनी सत्तेत असताना इतका भ्रष्टाचार केला की त्यांचं तिकीटच कापलं, अशी टीका जाधव यांनी बावनकुळेंवर केलीय. शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसला हा बावनकुळेंचा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. कारण निवडणुकीपूर्वी समान जागांचा फॉर्म्युला ठरला होता. त्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला गेले नव्हते. तर अमित शाह स्वत: मातोश्रीवर आले होते. असं असताना भाजपनं शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात अनेक ठिकाणी बंडखोर उभे केले. खतं तर भाजपनंच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, असा पलटवार जाधव यांनी केलाय.

शिवसेना संपवल्याशिवाय राहणार नाही- बावनकुळे

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमच्याबरोबर युती करून लढली. केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या करिश्म्याचा फायदा करून घेण्यासाठीच शिवसेना आमच्यासोबत होती. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादीसोबतही छुपी युती केली होती, असा गौप्यस्फोट भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची छुपी युती ही गेल्या निवडणुकीतच होती. शिवसेना हा पाठित खंजीर खुपसणारा पक्ष आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार भाजपनं केल्याचा दावाही बावनकुळेंनी केला होता.

शिवसेना-राष्ट्रवादीचा छुपा अजेंडा तयार होता

शिवसेना आणि राष्ट्रवादी हे वेगवेगळे पक्ष आहेत. त्यांचे विचार वेगळे आहेत. त्यांनी कुणासोबत युती करावी हा त्यांचा निर्णय आहे. पण जाणीवपूर्वक सांगतो, विधानसभेच्या सहा महिन्यांपूर्वीच सेना-राष्ट्रवादीची युती झाली होती. फडणवीसांचा प्रभाव वापरून अधिकाधिक जागा निवडून आणा आणि पळून या. मातोश्रीचे दरवाजे भाजपला बंद करा, असं आधीच ठरलं होतं. तसा अजेंडा तयार करण्यात आला होता. लपून अजेंडा तयार करण्यात आला होता. पूर्वी छुपी युती केली होती, आता उघड केली आहे, असा आरोपही बावनकुळेंनी केला होता.

संबंधित बातम्या :

100 युनिट पर्यंतचे वीज बिलं माफ करण्याचं आश्वासन ऊर्जामंत्र्यांचंच : चंद्रशेखर बावनकुळे

भाजपचे आणखी एक माजी मंत्री म्हणतात, सेना-भाजप एकत्र आल्यास नवल वाटू नये!

Prataprao Jadhav criticizes Chandrasekhar Bavankule

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.