राज्यपाल आणि आमचं एकमेकांवर प्रेम, ते 12 जणांची यादी नाकारणार नाहीत : राऊत
राज्यपाल घटनाबाह्य काम करणार नाहीत. ते 12 जणांची यादी नाकारणार नाहीत, असे संजय राऊत म्हणाले. (Shivsena MP Sanjay Raut on List of Governor elected 12 MLC)
मुंबई : “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सुज्ञ आहेत. राज्यपालांवर आमचं प्रेम आहे आणि त्यांचंही आमच्यावर प्रेम आहे. त्यामुळे ते महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यापाल नियुक्त 12 सदस्यांची नावं नाकरणार नाहीत,” अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच “अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या स्पष्टवक्ता आहेत, त्यांचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल,” असेही राऊतांनी यावेळी सांगितले. (Shivsena MP Sanjay Raut on List of Governor elected 12 MLC)
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी काल(6 नोव्हेंबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली.
“राज्यपाल हे सुज्ञ आहे. राज्यपालांवर आमचं प्रेम आहे आणि त्यांचंही आमच्यावर प्रेम आहे. ते किती प्रेम आहे हे देशाला माहिती आहे आणि या प्रेमातून यापुढे सर्व कारभार सुरळीत होईल. आम्ही राज्यपालांचा नेहमी आदर करतो. राज्यपाल घटनाबाह्य काम करणार नाहीत. ते 12 जणांची यादी नाकारणार नाहीत,” असे संजय राऊत म्हणाले.
“महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे लोकशाही मार्गाने, संपूर्ण घटनात्मक कायद्याचा आधार घेत सत्तेवर आलं आहे. ठाकरे सरकार हे घटनात्मक सरकार आहे. राज्यपाल हे या राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. राज्यपालांचं जे मत आहे, त्या मताचा आदर आम्ही नेहमी करतो. शेवटी कॅबिनेटचा निर्णयाचे पालन राज्यपालांना करावा लागतो.”
“राज्य सरकारने जी यादी पाठवली आहे, ती घटनेच्या आधारे पाठवली आहे. राज्य सरकारने कधीही घटनाबाह्य काम केले नाही आणि करणारही नाही. राज्य सरकारने ती यादी सर्व पक्षांचे एकमत झाल्यानंतर पाठवली आहे, त्यात काय सांगायचं आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.
“अभिनेत्री उर्मिला मातोडकरांचे नाव शिवसेनेच्या यादीत आहे. उर्मिलासारखी स्पष्टवक्ता, देशासह महाराष्ट्राच्या घडामोडींची माहिती असणारी अभिनेत्री जर संसदेत जाईल, तर त्याचा निश्चितच फायदा होईल,” असेही संजय राऊतांनी यावेळी सांगितले. (Shivsena MP Sanjay Raut on List of Governor elected 12 MLC)
संबंधित बातम्या :
विधानपरिषद : उर्मिला आणि नितीन बानुगडे विधानपरिषदेवर, शिवसेनेची चार नावं ठरली !