संजय राऊतांचा ईडी, सीबीआयवर निशाणा, व्यंगचित्र ट्वीट करत अप्रत्यक्ष भाजपवर टीका

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्वीट करत ईडी आणि सीबीआय या यंत्रणांवर निशाणा साधला. (Sanjay Raut Tweet On ED-CBI)

संजय राऊतांचा ईडी, सीबीआयवर निशाणा, व्यंगचित्र ट्वीट करत अप्रत्यक्ष भाजपवर टीका
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 10:04 AM

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापे मारले होते. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात सरनाईक कुटुंब ईडीच्या रडारवर आहे. या कारवाईनंतर शिवसेनेकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात येत आहे. नुकतंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्वीट करत ईडी आणि सीबीआय या यंत्रणांवर निशाणा साधला. (Sanjay Raut Tweet On ED-CBI)

संजय राऊत यांनी ट्वीट केलेल्या फोटोमध्ये दोन कुत्रे दिसत आहे. यातील एका कुत्र्यावर सीबीआय, तर दुसऱ्या कुत्र्यावर ईडी असे लिहिले आहे. रुक! अभी तय नही है, किसके घर जाना है… असे लिहिले आहे. विशेष म्हणजे या फोटोच्या उजव्या कोपऱ्यात महाराष्ट्र असे लिहिले आहे. संजय राऊतांनी तासाभरापूर्वी हा फोटो ट्वीट केला आहे. त्यांच्या या ट्वीटला हजारो नेटकऱ्यांनी लाईक केले आहे.

हे व्यंगचित्र ज्यांना समजलं, ते त्या भावनेनं घेतील, ज्यांना ते समजलेले नाही, ते अधिक सूड भावनेने वागतील, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

काय आहे प्रकरण?

ईडीने मंगळवारी सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी प्रताप सरनाईक भारताबाहेर होते. मात्र, ईडीचे छापे पडल्याचं कळताच ते मुंबईत परतले आणि त्यांनी तडक प्रभादेवीतील ‘सामना’ कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. तब्बल दीड तास या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली होती. त्यानंतर बोलताना ईडीने कारवाई का केली? कशासाठी केली? याची काहीच कल्पना नसल्याचं सरनाईक यांनी सांगितलं होतं. (Sanjay Raut Tweet On ED-CBI)

संबंधित बातम्या : 

प्रताप सरनाईक काही साधू संत नाही, नारायण राणेंची ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर-कार्यालयावर ईडीचे छापे, सुपुत्र विहंग सरनाईक चौकशीसाठी ताब्यात

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.