‘ईडी’ने आपली एक शाखा भाजप कार्यालयात उघडली!, सरनाईकांच्या घरावरील छापेमारीवर संजय राऊतांचा टोला

'प्रताप सरनाईक घरी नसताना त्यांच्या घरावर टाकलेला छापा म्हणने नामर्दानगी आहे. दिल्लीच नाही तर इंटरपोलची टीम आली तरी काही फरक पडणार नाही. भाजपनं सरळ लढाई करावी. शिखंडीसारखं ईडी किंवा सीबीआयचं बाहुलं हाती धरुन कारवाई करण्याला आम्ही घाबरत नाही', असं आव्हानच संजय राऊत यांनी दिलं आहे.

'ईडी'ने आपली एक शाखा भाजप कार्यालयात उघडली!, सरनाईकांच्या घरावरील छापेमारीवर संजय राऊतांचा टोला
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 12:00 PM

मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापेमारी सुरु केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ईडीनं आपली एक शाखा भाजप कार्यालयात उघडल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे. आमच्या आमदार, खासदारांच्या घरासमोर ईडीनं तळ ठोकला तरी आम्ही घाबरणार नाही, अशा इशाराच राऊत यांनी दिला आहे. (Shivsena MP Sanjay Raut warns BJP after raid on Pratap Saranaik’s house)

‘प्रताप सरनाईक घरी नसताना त्यांच्या घरावर टाकलेला छापा म्हणजे नामर्दानगी आहे. दिल्लीतूनच नाही तर इंटरपोलची टीम आली तरीही काही फरक पडणार नाही. भाजपनं सरळ लढाई करावी. शिखंडीसारखं ईडी किंवा सीबीआयचं बाहुलं हाती धरुन कारवाई केली तरी आम्ही घाबरत नाही’, असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे. सरकार आणि सरकारशी संबंधित लोकांना, त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचं काम भाजपकडून सुरु आहे. पण कितीही त्रास द्या, कितीही खोटे गुन्हे दाखल करा, कितीही खोटे कागदपत्र तयार करा, पण शिवसेना किंवा महाविकास आघाडीचा एकही आमदार भाजपच्या हाती लागणार नाही, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे.

‘ईडी, सीबीआयनं बाहुलं बनू नये’

ईडी, सीबीआय सारख्या संस्थांनी केंद्रीय सत्तेच्या हातचं बाहुलं म्हणून काम करु नये. महाराष्ट्राला, महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र सुरु आहे. भाजपशासित राज्यात एकही नोटीस का जात नाही? मी 100 लोकांची नावं देतो. त्यांच्याकडे पैसा कुठून येतो? निवडणूक काळात पैशाचे काय व्यवहार होतात? याचाही तपास करा, असं आव्हानच राऊत यांनी ईडीला दिलं आहे.

साम, दाम, दंड, भेदात आमची डॉक्टरेट- राऊत

2 महिन्यात राज्यात सत्तापालट होऊन भाजपचं सरकार येईल, असा दावा भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. त्यावर साम, दाम, दंड, भेदात आमची डॉक्टरेट झाली आहे. त्यातूनच आमचा जन्म झाला आहे. त्यामुळे साम, दाम, दंड, भेदाची भाषा आमच्यासमोर करु नका, असा दम संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना भरला आहे. पुढील पाच नाही तर आता भाजपनं पुढील २५ वर्षे सत्तेची स्वप्न पाहू नयेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.

संबंधित बातम्या:

शिवसेनेचे मुखियाही असेच उद्योग-धंदे करतात हे सर्वांना माहीत, किरीट सोमय्यांचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्ला

ED raids on Pratap Sarnaik | ईडीची जय्यत तयारी, सरनाईकांवरील धाडीसाठी पुण्याहून खास फौजफाटा मागवला

“खयालों में जिते रहो, त्यात चार वर्ष निघून जातील”, संजय राऊतांचा भाजप नेत्यांना टोला

Shivsena MP Sanjay Raut warns BJP after raid on Pratap Saranaik’s house

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.