महाराष्ट्रात नाही गेले, जम्मू काश्मीरला जाणार!! संजय राऊतांनी भारत जोडो यात्रेचा मुद्दा स्पष्ट केला

मी जम्मू काश्मीरच्या भूमीवर शिवसेनेतर्फे उपस्थित राहील आणि यात्रेत सहभागी होईल. ही तारीख 20 जानेवारी असेल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

महाराष्ट्रात नाही गेले, जम्मू काश्मीरला जाणार!! संजय राऊतांनी भारत जोडो यात्रेचा मुद्दा स्पष्ट केला
संजय राऊत Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 11:08 AM

मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे येत्या 20 जानेवारी रोजी राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागी होणार आहेत. कन्याकुमारीपासून निघालेली राहुल गांधी यांची यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. मधल्या काळात ही यात्रा महाराष्ट्रात येऊन गेली, मात्र संजय राऊत त्यात सहभागी झाले नाहीत. येत्या २० जानेवारी रोजी यात्रेच्या अंतिम टप्प्यात जम्मू काश्मीरमध्ये संजय राऊत यात्रेत सहभाग नोंदवतील, अशी माहिती नुकतीच त्यांनी दिली.

महाराष्ट्रात नाही, जम्मूत का?

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, यात्रेचा शेवटचा टप्पा जम्मू काश्मीरमध्ये आहे. हा या देशासाठी अत्यंत संवेदनशील असा भूभाग आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं त्या भूमीशी भावनिक नातं आहे. त्या नात्यानं मी जम्मू काश्मीरच्या भूमीवर शिवसेनेतर्फे उपस्थित राहील आणि यात्रेत सहभागी होईल. ही तारीख 20 जानेवारी असेल…

पंतप्रधानांनीही कौतुक केलं पाहिजे…

राहुल गांधी यांच्या यात्रेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं पाहिजे, अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘ संपूर्ण देश राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी झाला आहे. 4 हजार किलोमीटर प्रवास केला आहे.

त्याचं कौतुक पंतप्रधानांनी करायला हवं. देशातला एक तरुण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हजारो लोकांना सोबत घेऊन देशाच्या एकतेसाठी, सूड भावना नष्ट करण्यासाठी चालतोय.

अशा यात्रेत सहभागी होणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. महाराष्ट्रात ही यात्रा आली तेव्हा स्वतः आदित्य ठाकरे नांदेडला गेले, यात्रेत सहभागी झाले.

राहुल गांधी यांची यात्रा नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात होती. स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांचे नोकर होते.. ब्रिटिशांकडून त्यांना वेतन मिळत होते, अशा प्रकारचं वक्तव्य करून राहुल गांधींनी राजकीय वर्तुळात खळबळ माजवली होती.

महाराष्ट्रातील हिंगोली, वाशिम, अमरावती, बुलढाणा आदी ठिकाणी राहुल गांधींच्या सभा झाल्या. संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात त्या वेळी नुकताच जामीन मिळाला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते महाराष्ट्रातील यात्रेत सहभागी झाले नव्हते.

मात्र आता भारत जोडो यात्रेच्या अखेरच्या टप्प्यात संजय राऊत जम्मू काश्मीर येथे राहुल गांधींसोबत पायी चालतील, अशी माहिती त्यांनी दिली.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....