परदेशातील लोकांना लस द्यायची आणि देशातील लोकांना मारायचा असा केंद्र सरकारचा धंदा : विनायक राऊत
देशातील लोकांना मारायचा असा केंद्र सरकार धंदा आहे, असा घणाघात विनायक राऊत यांनी केला आहे. (MP Vinayak Raut Criticizes Central Government)
सिंधुदुर्ग : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ऑक्सिजन, रेमडेसिव्हीरसह अनेक औषधांचा तुटवडा जाणवत आहे. तसेच राज्यात कोरोना लसीचाही तुटवडा भासत आहे. यावरुन खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकावर जोरदार टीका केली आहे. देशातील लोकांना मारायचा असा केंद्र सरकार धंदा आहे, असा घणाघात विनायक राऊत यांनी केला आहे. (MP Vinayak Raut Criticizes Central Government on Corona vaccine)
देशातील लोकांना मारायचं असा केंद्र सरकाराचा धंदा
“परदेशातील लोकांना आपलं काही तरी देणं-घेणं लागत म्हणून त्यांना लस द्यायची. मात्र आपल्या देशातील लोकांना मारायचं असा केंद्र सरकाराचा धंदा आहे. राज्यातून रेमडेसिव्हीर निर्यात ताबडतोब थांबवण्याची आवश्यकता होती. ती बऱ्याच दिवसानंतर थांबवली,” असे विनायक राऊत म्हणाले.
हवाई वाहतूकीद्वारे प्राणवायू महाराष्ट्रात द्यावा
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ऑक्सिजनची मागणी केली. त्याला पंतप्रधानांनी ऑक्सिजन द्यायची तयारी दाखवली माञ ती कुठून ? तर पश्चिम बंगालमधून. म्हणजे बंगाल ते मुंबई हा जर प्रवास बघितला तर कशा पद्धतीने ते ऑक्सिजन देणार आहेत हे तुमच्या सर्वाच्या लक्षात येईल,” असा टोला विनायक राऊतांनी लगावला.
“पंतप्रधानांनी सहानभुतीपूर्वक माणुसकीच्या दृष्टीने विचार करून हवाई वाहतूकीद्वारे प्राणवायू महाराष्ट्रात द्यावा,” असेही विनायक राऊत म्हणाले.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या किती?
राज्यात काल 63,729 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (Corona Positive) आढळलेत. राज्यातील अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची एकूण रुग्णसंध्या 6,38,034 इतकी झाली आहे. तर राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 37,03,584 झाली आहे.
राज्यात काल 398 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. तर राज्यातील मृत्यू दर 1.61% एवढा झालाय. तसेच राज्यात आज 45,335 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण 30,04,391 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.12 एवढे झालेय. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2,33,08,878 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 37,03,584 (15.89 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत, तर सध्या राज्यात 35,14,181 व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत, तर 25,168 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांना फटका
राज्यात एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असताना दुसरीकडे औषधांचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. तर दुसरीकडे रेमडेसिव्हीरचा पुरवठाही तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना याचा फटका बसत आहे. (MP Vinayak Raut Criticizes Central Government on Corona vaccine)
संबंधित बातम्या :
Kumbh Mela : कुंभमेळा प्रतिकात्मक करा, पंतप्रधान मोदींचं आवाहन, आखाड्याचा तातडीने रिप्लाय
देशभर चिता जळत आहेत, शहाणे व्हा, चितेत राजकारण जाळा; संजय राऊतांचं विरोधकांना आवाहन