“ज्यांचं तोंड फाटलेलं त्यांना उत्तर द्यायची गरज नाही”, शिवसेनेच्या बड्या नेत्यानं नितेश राणेंना फटकारलं

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणे यांना चांगलंच फटकारलं आहे. (shivsena vinayak raut nitesh rane anil parab)

ज्यांचं तोंड फाटलेलं त्यांना उत्तर द्यायची गरज नाही, शिवसेनेच्या बड्या नेत्यानं नितेश राणेंना फटकारलं
नितेश राणे, भाजप आमदार
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 4:16 PM

रत्नागिरी : मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारवर अनेक गंभीर आरोप होत आहे. 100 कोटी रुपये वसुलीचे आरोप झाल्यानंतर अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर आता परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बमुळे अनेक आरोप होत आहेत. भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सचिन वाझे आणि अनिल परब (Anil Parab) यांचे संवाद एनआयएकडे आहेत, असा दावा केला. त्यांच्य याच दाव्यानंतर आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी राणे यांना चांगलंच फटकारलं आहे. त्यांनी ज्यांचं तोंड फाटलेलं आहे, त्यांना उत्तर द्यायची गरज नाही, अशा टोकदार शब्दांत राणेंवर टीका केली आहे. (Shivsena MP  Vinayak Raut slams BJP leader Nitesh Rane on Anil Parab allegations)

विनायक राऊत काय म्हणाले ?

अनिल परब हे पूर्णपणे निर्दोष आहेत. त्यांनी भुमिका स्पष्ट केली आहे. भूमिका स्पष्ट करताना त्यांच्यात आत्मविश्वास दिसत होता. त्यामुळे त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. एनआयए किंवा सीबीआय काय करणार आहे ?, हे भाजपचे लोकं अगोदरच बोलून मोकळे होतात. या यंत्रणांचा वापर भाजप कसं करतेय, हे देशातल्या लोकांना कळून चुकलंय. अनिल परब हे एनआयएला संपूर्ण सहकार्य करतील,” असं विनायक राऊत म्हणाले. तसेच सचिन वाझे आणि अनिल परब यांच्यातील संवाद एनआयएकडे आहेत, या नितेश राणे यांच्या दाव्याबद्दल बोलताना, ज्यांचं तोंड फाटलेलं आहे त्यांना मला उत्तर देण्याची गरज नाही, असेसुद्धा विनायक राऊत म्हणाले.

सचिन वाझेंचा बोलवता धनी बाहेर येणार

यावेळी बोलताना विनायक राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली. “भाजपच्या नेत्यांनी मागणी केली म्हणजे राजीनामा द्यावा, असं काही नाही. यापूर्वीसुद्धा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी किंवा सध्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर भूतकाळात याहीपेक्षा भयानक आरोप केले होते. त्यामुळे त्यांनी त्यावेळी राजीनामा दिला होता की नाही हे प्रकाश जावडेकर यांनी पडताळून पाहावं. सचिन वाझे यांचा बोलवता धनी कोण हे तपासातून बाहेर येईलच,” असेही राऊत म्हणाले.

नितेश राणेंनी काय दावा केला ?

अनिल परब यांच्यावर आरोप झाल्यानंतर नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. सचिन वाझे आणि अनिल परब यांचे संवाद आणि टेलिग्रामचे चॅट एनआयकडे आहेत, असे नितेश राणे म्हणाले. तसेच यावेळी बोलताना त्यांनी परब यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीसुद्धा त्यांनी केली. जो नियम अजित पवार, अनिल देशमुख आणि अशोक चव्हाण यांना लागू झाला. तोच नियम अनिल परब यांना लागू होऊन त्यांनी राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे असे राणे म्हणाले होते.

इतर बातम्या :

लसीकरणाचा उत्सव जरूर करू, पण आधी लस तर द्या; जयंत पाटलांचा खोचक टोला

Maharashtra Weekend Lockdown | वीकेंड लॉकडाऊनचं काऊंटडाऊन सुरू; वाचा, संपूर्ण नियमावली काय?

मरणाच्या सरणावर महाराष्ट्राला कोण ढकलतंय?, लसीबाबत महाराष्ट्रासोबत भेदभाव?; वाचा सविस्तर

(Shivsena MP  Vinayak Raut slams BJP leader Nitesh Rane on Anil Parab allegations)

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.