बाळासाहेबांबद्दल आदर आणि उद्धव ठाकरेंविषयी गरळ, नारायण राणे म्हणजे दुतोंडी साप, नीलम गोऱ्हेंचा वार

शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर हल्ला चढवला आहे. बाळासाहेबांबद्दल आदर आणि उद्धव ठाकरेंविषयी गरळ, हे तर दुतोंडी साप आहेत, अशा शब्दात त्यांनी नारायण राणे यांचा समाचार घेतला आहे.

बाळासाहेबांबद्दल आदर आणि उद्धव ठाकरेंविषयी गरळ, नारायण राणे म्हणजे दुतोंडी साप, नीलम गोऱ्हेंचा वार
नीलम गोऱ्हे आणि नारायण राणे
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 2:18 PM

मुंबई : शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर हल्ला चढवला आहे. बाळासाहेबांबद्दल आदर आणि उद्धव ठाकरेंविषयी गरळ, हे तर दुतोंडी साप आहेत, अशा शब्दात त्यांनी नारायण राणे यांचा समाचार घेतला आहे.

नारायण राणे म्हणजे दुतोंडी साप

एका बाजूला बाळासाहेबांप्रति आदर व्यक्त करायचा आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना शिवसेनाप्रमुखांनी राज्याची सेवा करण्यासाठी आशीर्वाद दिले होते, त्या उद्धव ठाकरेंविषयी सातत्याने गरळ ओकायची म्हणजे दुतोंडी सापासारखे ह्यांचे वर्तन आहे, असं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी राणेंवर टीकेची तोफ डागली.

राणेंचं समर्थन करणं फडणवीसांची मजबुरी

देवेंद्र फडणवीस यांनी राणेंचे समर्थन केले ही त्यांची मजबुरी आहे. ते नारायण राणे यांच्यामागे फरफटत जात आहेत. ह्या फरफटत जाण्याचा अर्थ काही दिवसांत त्यांच्या लक्षात येईल. आमच्यावर बोलत राहिल्याशिवाय नारायण राणेंना मीडिया प्रसिद्धी देत नाही म्हणून ते रोज बोलतात, असा टोलाही त्यांनी राणेंना लगावला.

‘उथळ पाण्याला खळखळाट फार’, राणेंची अवस्था अगदी तशी

मुंबई महापालिकेच्या नाटकाचा प्रयोग चार वेळा झालाय. मुंबई आणि कोकणवासीयांचे शिवसेनेवर किती प्रेम आहे हे सर्वांनी पाहिले आहे. कोरोना काळात ज्या प्रकारची सेवा शिवसेनेने केले ते कधीच कुणी नाकारणार नाही. मंत्री पद मिळाले म्हणून सतत बोलत राहून लोकांची दिशाभूल करत राहणे एवढाच त्यांचा अजेंडा आहे. मराठीत म्हण आहे ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ तशा पद्धतीचं त्यांचं बोलणं आहे, असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

हे ही वाचा :

शुद्धीकरणासाठी ब्राह्मण लागतो, आम्हाला मागायला हवा होता. आमच्याकडे खूप आहेत; राणेंचा शिवसेनाला खोचक टोला

पवार म्हणाले, जेवायचं निमंत्रण दिलं, पण हातपाय बांधले; राणे म्हणतात, परिपक्व राजकारणी आहात, हात सोडवून घ्या

बाळासाहेबांचं स्मारक दलदलीत, मी पुत्र असतो तर त्यांना इथे येऊच दिलं नसतं; राणेंचा हल्लाबोल

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.