धनुष्यबाण कुणाचा? निवडणूक आयोगासमोर आजच्या सुनावणीत काय घडलं?

शिवसेना पक्षावरील निर्णय घेण्यात केंद्रीय निवडणूक आयोग पळवाट काढतंय, असा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केलाय.

धनुष्यबाण कुणाचा? निवडणूक आयोगासमोर आजच्या सुनावणीत काय घडलं?
Follow us
| Updated on: Dec 12, 2022 | 4:08 PM

नवी दिल्लीः केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Election Commission) आज शिवसेना पक्षासंदर्भात महत्त्वाची सुनावणी पार पडणार होती. दोन्ही पक्षाच्या वकिलांनी आयोगासमोर उपस्थिती लावली. आज ठाकरे (Thackeray) गट आणि शिंदे गट या दोघांकडूनही जबरदस्त युक्तिवाद होण्याची चिन्ह होती, मात्र आज फक्त पाच ते सात मिनिटं हे प्रकरण आयोगासमोर चाललं. मुख्य याचिकेच्या अनुषंगाने इतर दोन ते तीन अर्ज आल्याने यासंदर्भातील सविस्तर सुनावणी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाईल, असा आदेश निवडणूक आयोगाने दिला. शिवसेना नेते अनिल देसाई (Anil Desai) यांनी ही माहिती दिली.

आजच्या सुनावणीदरम्यान, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल तर महेश जेठमलानी उपस्थित होते. ठाकरे गटाचे महत्त्वाचे लोकप्रतिनिधीदेखील उपस्थित होते. मात्र शिंदे गटाकडून कोणतेही नेते निवडणूक आयोगाच्या सुनावणीला उपस्थित होते. सुनावणी झाली तेव्हा दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला. मात्र काही वेळातच यापुढील सुनावणी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल, असे सांगण्यात आले.

ठाकरे गटाची संतप्त प्रतिक्रिया

शिवसेना पक्षावरील निर्णय घेण्यात केंद्रीय निवडणूक आयोग पळवाट काढतंय. शेवटची तारीख  डिसेंबर 23 होती, तीदेखील पुढे ढकलली, असा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केलाय.

ठाकरे गटातर्फे 20 लाख प्रतिणापत्र दाखल केली आहेत. शिंदे गटाला वेळ देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं तारीख पुढे ढकलली, असा आरोप त्यांनी केला. शिंदे गटानं दिलेली कागदपत्रे आम्हाला तपासायची आहेत, अशी मागणी अरविंद सावंत यांनी माध्यमांसमोर केली.

केंद्रीय संस्था बरबटलेल्या आहेत. हे सगळं आता लोकशाहीच्या मूळावर आलंय. केंद्रीय संस्था मूळ उद्दिष्ट आणि कर्तव्यापासून दूर गेल्या आहेत, अशी खंत अरविंद सावंत यांनी व्यक्त केली.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.