युतीच्या निषेधार्थ नगरच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
अहमदनगर : भाजप-शिवसेनेची युती झाल्यामुळे अहमदनगरला जिल्हा समन्वयकांसह श्रीगोंद्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजनामा दिलाय. तर जिल्हा समन्वयक घनश्याम शेलार यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर लढणार असे सांगितले. त्यामुळे आम्ही जोरदार तयारी केली. तसेच भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र एका रात्रीत युती झाल्याने शिवसैनिकांचा विश्वासघात झाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीच्या आधीच अहमदनगरमध्ये शिवसेनेला […]
अहमदनगर : भाजप-शिवसेनेची युती झाल्यामुळे अहमदनगरला जिल्हा समन्वयकांसह श्रीगोंद्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजनामा दिलाय. तर जिल्हा समन्वयक घनश्याम शेलार यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर लढणार असे सांगितले. त्यामुळे आम्ही जोरदार तयारी केली. तसेच भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र एका रात्रीत युती झाल्याने शिवसैनिकांचा विश्वासघात झाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीच्या आधीच अहमदनगरमध्ये शिवसेनेला खिंडार पडल्याचं चित्र आहे. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक घनश्याम शेलार यांची शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्याने खळबळ उडाली आहे. आता येत्या निडणुकीत त्याचा काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. घनश्याम शेलार यांना उमेदवारी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र युती झाल्यामुळे ही जागा भाजपला जाणार आहे. युतीमुळे त्यांची पंचायत झाली आणि त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय.
शिवसेना-भाजपची युती
नाही, नाही म्हणत शिवसेनेने अखेर भाजपशी जुळतं घेतलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. यामुळे भाजप आणि शिवसेनेचे विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते नाराज आहेत. कारण, अगोदर स्वबळाचा नाराज दिल्याने इच्छुकांनी तयारीही सुरु केली होती. पण ऐनवेळी युतीची घोषणा झाल्याने या इच्छुकांची तारांबळ झाली आहे.
VIDEO :