शिवसेनेच्या भाजपसमोर दोन अटी, पहिली अट 155 जागांची, दुसरी काय?

मुंबई: लोकसभा निवडणुकांसाठी चार ते पाच महिने राहिले असताना, आता शिवसेना आपले फॉर्मुले सादर करत आहे. यापूर्वी शिवसेनने स्वबळाचा नारा दिला असतानाही, भाजपने शिवसेनेसोबतच्या युतीसाठी आग्रह धरला आहे. मात्र आता शिवसेनेने भाजपसमोर काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने दोन अटींचा समावेश आहे. विधानसभेच्या 155 जागा शिवसेनेला द्या आणि लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घ्या, या दोन प्रमुख […]

शिवसेनेच्या भाजपसमोर दोन अटी, पहिली अट 155 जागांची, दुसरी काय?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

मुंबई: लोकसभा निवडणुकांसाठी चार ते पाच महिने राहिले असताना, आता शिवसेना आपले फॉर्मुले सादर करत आहे. यापूर्वी शिवसेनने स्वबळाचा नारा दिला असतानाही, भाजपने शिवसेनेसोबतच्या युतीसाठी आग्रह धरला आहे. मात्र आता शिवसेनेने भाजपसमोर काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने दोन अटींचा समावेश आहे. विधानसभेच्या 155 जागा शिवसेनेला द्या आणि लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घ्या, या दोन प्रमुख अटी शिवसेनेने भाजपसमोर ठेवल्या आहेत.

दुसरीकडे भाजपने शिवसेनेला 138 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता या जागांची देवाण-घेवाण फॉरम्युला कधीपर्यंत सुरु राहणार हे पाहावं लागणार आहे.

दरम्यान, शिवसेनेने यापूर्वीच भाजपसोबत युती न करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र भाजपने सातत्याने युतीचा आग्रह धरला आहे. त्यानंतर आता शिवसेनेने युतीसाठी भाजपसमोर या अटी ठेवल्या आहेत. या अटी भाजप मान्य करणार का हे पाहावं लागणार आहे.

भाजपने पाच राज्यात सपाटून मार खाल्ला. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता होती, ती सुद्धा भाजपने गमावली. त्यातच राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन काँग्रेसने भाजपला घेरलं आहे. त्यामुळे भाजप सध्या अडचणीत आहे. दुसरीकडे भाजपचे मित्रपक्षी हळूहळू साथ सोडत आहेत, अशा सर्व परिस्थितीत महाराष्ट्रात भाजपला सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेची साथ आवश्यक वाटते. त्यामुळे भाजप सातत्याने युतीसाठी शिवसेनेला आग्रह करत आहे.

युतीसाठी भाजप पुढाकार घेईल: मुख्यमंत्री

दरम्यान शिवसेना आणि भाजप यांच्यात युतीसाठी आम्ही पुढाकार घेऊ. राजकीय वास्तविकतेनुसार शिवसेना-भाजप एकत्र येतील, त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होणार नाही. आम्ही दोघे एकत्र लढलो तर एकतर्फी विजय होईल, स्वतंत्र लढल्यास आव्हान उभं राहिल पण जिंकू नक्कीच, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीच्या महाराष्ट्र महामंथन या कार्यक्रमात सांगितलं होतं.

तसंच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका त्या त्या वेळेत होतील, दोन्ही निवडणुका एकत्र व्हाव्या हे खर्च, वेळ, कष्ट टाळण्याच्या दृष्टीने योग्य आहे. पण लोकसभा निवडणुका लोकसभेच्या वेळेत, आणि विधानसभा निवडणुका विधानसभेच्या वेळेत होतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.

संबंधित बातम्या 

महाराष्ट्र महामंथन : प्रश्नांपासून पळणार नाही, ब्राह्मण आरक्षण शक्य नाही- मुख्यमंत्री 

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.