Shivsena : विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून राजन साळवीचा अर्ज दाखल, चुरशीच्या लढतीकडे राज्याचं लक्ष
Shivsena : विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून राजन साळवीचं नाव निश्चित, सूत्रांची माहिती
मुंबई : सध्या राज्यात सत्तांतर झालंय. त्यामुळे येत्या काळात विधीमंडळात काही बदल पाहायला मिळणार आहेत. यात मागच्या काही दिवसांपासून रिक्त असणारं विधानसभा अध्यक्षपद आता लवकरच भरलं जाणार आहे. यासाठी शिवसेनादेखील अर्ज दाखल करत आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांचं नाव निश्चित झालं आहे. राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी (Rajan Salavi) यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपच्या राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि राजन साळवी यांच्यात ही लढत होईल.
राजन साळवी यांचा अर्ज दाखल
मागच्या काही दिवसांपासून रिक्त असणारं विधानसभा अध्यक्षपद आता लवकरच भरलं जाणार आहे. यासाठी शिवसेनादेखील अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव चर्चेत होतं. पण ऐनवेळी धक्का तंत्राचा वापर करत भाजपच्या वतीने राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली. शिवाय त्यांचा अर्जही दाखल करण्यात आला आहे.
“आणखी दोन अर्ज दाखल करणार”
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाबाबत आपलं मत मांडलं. महाविकास आघाडीकडून अजून दोनं अर्ज दाखल केले जातील आणि अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत विचार करून अर्ज मागे घेतले जातील, असं नाना पटोले म्हणाले आहेत. काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हेदखील अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.
दोन उमेदवारी अर्ज दाखल
भाजपच्या वतीने राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली. शिवाय त्यांचा अर्जही दाखल करण्यात आला आहे. राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपच्या राहुल नार्वेकर आणि राजन साळवी यांच्यात ही लढत होईल.