Shiv Sena | खचलेत्या शिवसेनेचं उद्या मुंबईत शक्तीप्रदर्शन, शिंदेंच्या बंडानंतरचा पहिला मेळावा, आदित्य ठाकरे उत्साह भरू शकतील?

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचा पहिला जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला उद्या आदित्य ठाकरे संबोधित करतील. युवासेनेत लोकप्रिय नेतृत्व असलेले आदित्य ठाकरे शिवसैनिकांमध्ये उत्साह भरू शकतील का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Shiv Sena | खचलेत्या शिवसेनेचं उद्या मुंबईत शक्तीप्रदर्शन, शिंदेंच्या बंडानंतरचा पहिला मेळावा, आदित्य ठाकरे उत्साह भरू शकतील?
Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 4:07 PM

मुंबईः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर प्रथमच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. मुंबईतील सर्व शिवसैनिक आणि युवा सैनिकांनी या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे. उद्या म्हणजेच शनिवारी संध्याकाळी 6.30 वाजता हा मेळावा असून या निमित्ताने शिवसेना पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन करणार आहे. विशेष म्हणजे या मेळाव्याला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे नाही तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. महाविकास आघाडीचा प्रमुख पक्ष शिवसेना पूर्णपणे पोखरली गेल्याने सध्या शिवसेनेची अवस्था  खिळखिळी झाली आहे. विधानसभेतील बहुतांश आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारून एकनाथ शिंदेंच्या गटाची वाट धरली आहे. आता आगामी महानगर पालिका निवडणुकीत तरी शिवसैनिक नगरसेवक, पदाधिकारी फुटू नयेत, या दृष्टीने शिवेसेनेच्या हालचाली सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसैनिकांचा भव्य मेळावा उद्या आयोजित करण्यात आला आहे.

शनिवारी संध्याकाळी शक्तीप्रदर्शन

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शनिवारी शिवसेनेच्या वतीनं आयोजित केलेल्या या मेळाव्यात शिवसैनिकांचं मोठं शक्ती प्रदर्शन पहायला मिळणार आहे. दक्षिण मुंबई विभागाच्या वतीनं हा जाहीर मेळावा असून युवानेते आदित्य ठाकरे यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. मरीन लाइन्स येथील बिरला मातोश्री सभागृह येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

आदित्य ठाकरे उत्साह भरू शकतील?

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट पडले असून उद्धव ठाकरेंशीच निष्ठावंत राहणाऱ्यांचा एक गट आहे तर आमदारांनी बंड केलं ते चांगलं केलं, असं म्हणणाऱ्यांचा एक गट आहे. खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या आमदारांना परत येण्यासाठी भावनिक आवाहन केलं होतं. मात्र त्याचा फार परिणाम झाला नाही. उलट शिंदे गटाकडे जाणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ झाली. त्यांनंतर आता शिवसैनिकांच्या जाहीर मेळाव्याला उद्या आदित्य ठाकरे संबोधित करतील. युवासेनेत लोकप्रिय नेतृत्व असलेले आदित्य ठाकरे शिवसैनिकांमध्ये उत्साह भरू शकतील का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उद्धव ठाकरे आज काय म्हणाले?

दरम्यान, आज शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक आज पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं.   शिवसेनेसाठी जीवही देईन.. मरेन पण शिवसेना सोडणार नाही, असे म्हणणारे आज पळून गेले. मात्र बंडखोरांनी यापुढे शिवसेना आणि ठाकरे या दोन नावांव्यतिरिक्त जगून दाखवावं, असं खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी आज बंडखोरांना दिलंय. तसंच निष्ठावंत शिवसैनिकांना पुढील संघर्षासाठी प्रोत्साहन दिलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.